नाशिक : शासनाने जिल्हा परिषदेच्या वर्ग क व वर्ग ड कर्मचार्यांच्या बदल्या करण्यास हिरवा कंदील दाखविला असून, त्यानुसार जिल्हास्तरावरील कर्मचार्यांच्या १७ ते २३ मेदरम्यान, तर तालुकास्तरावरील कर्मचार्यांच्या २६ ते ३१ मेदरम्यान बदल्या होणार आहेत. ग्रामपंचायत विभागांतर्गत २८ ग्रामविकास अधिकारी व १२३ ग्रामसेवक अशा दीडशे कर्मचार्यांच्या बदल्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शिक्षण विभाग वगळता अन्य सर्वच विभागांतील कर्मचार्यांची सेवाज्येष्ठता यादी नोटीस फलकावर लावण्यात आली असून, येत्या तीन दिवसांत त्यावर आक्षेप मागविलेे आहेत. ग्रामपंचायत विभागाकडील बदलीपात्र कर्मचार्यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यात सेवाज्येष्ठतेनुसार पाच टक्के विनंती व पाच टक्के प्रशासकीय स्वरूपातील बदलीपात्र कर्मचार्यांची संख्या दीडशेच्या घरात पोहोचली आहे. त्यात १४ प्रशासकीय व १४ विनंती स्वरूपातील बदलीपात्र ग्रामविकास अधिकार्यांची संख्या आहे. त्याचप्रमाणे ग्रामसेवकपदाच्या १२३ कर्मचार्यांच्या बदल्या होणार असून, त्यातही निम्मे ग्रामसेवक प्रशासकीय व निम्मे विनंती बदलीसाठी पात्र ठरणार आहेत. मुख्यालयात प्रत्येक विभागासमोर बदलीपात्र कर्मचार्यांची यादी नोटीस फलकावर लावण्यात आली असून, त्या यादी पाहण्यासाठी कर्मचार्यांनी गर्दी केल्याचे चित्र होते. बदलीपात्र कर्मचार्यांची सर्वाधिक संख्या शिक्षण व आरोग्य विभागात असून, शिक्षण विभाग त्यांच्या बदलीपात्र कर्मचार्यांची यादी येत्या ११ मे रोेजी नोटीस फलकावर लावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दीडशे ग्रामसेवकांच्या होणार बदल्या
By admin | Updated: May 7, 2014 21:21 IST