शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

उचलबांगडी : इंदिरानगरचा ‘दबंग’ पोलीस अधिकारी नियंत्रण कक्षात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 18:41 IST

या घटनेनंतर नांगरे-पाटील यांनी सहायक आयुक्त वसावे यांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते. हा चौकशी पुर्ण होताच त्यांनी अनिल पाटील यांची उचलबांगडी करत नियंत्रण कक्षामध्ये नेमणूकीचे आदेश त्यांनी दिले.

ठळक मुद्देखुर्च्यांची उलथापालट; ग्राहकांना धक्काबुक्की

नाशिक : पोलीस ठाणे हद्दीतील एक शाकाहारी ढाबा रात्रीच्या सुमारास बळजबरीने बंद करताना पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटील यांनी ‘दबंगगिरी’ केल्याचा धक्कादायक प्रकार मागील महिन्यात उघडकीस आला होता. ढाब्यावर तत्काळ पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील पोहचल्याने ग्राहकांनी त्यांच्याकडे गा-हाणे मांडत पोलीस अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर नांगरे-पाटील यांनी सहायक आयुक्त वसावे यांना सखोल चौकशीचे आदेश दिले होते. हा चौकशी पुर्ण होताच त्यांनी अनिल पाटील यांची उचलबांगडी करत नियंत्रण कक्षामध्ये नेमणूकीचे आदेश त्यांनी दिले.एप्रिल महिन्यात शनिवारी (दि.२७) आयुक्तालय हद्दीत मिशन आॅल आउट, कोम्बिंग आॅपरेशन रात्री राबविले जात होते. गस्तीवर असताना, त्यांना येथील एक शाकाहारी ढाबा सुरू असल्याचे लक्षात आले. यावेळी ढाबाचालकास ढाबा तासाभरात बंद करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या व पथक पुढे रवाना झाले; मात्र तासाभरानंतरही ढाबा सुरूच असल्याचे पथकाला पुन्हा आढळून आले. यावेळी पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने ग्राहकांना बळजबरीने बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळी काही वकील व त्यांचे कुटुंबीय होते. यावेळी अधिकारी मद्याच्या नशेत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस वाहनाला घेराव घालत रोखून अधिका-याला त्याच ठिकाणी रोखून धरले.  ‘त्या’ पोलीस अधिका-याने सोडलेल्या फर्मानानंतर वाहनातील पोलीस कर्मचाऱ्यांनी ढाब्यामध्ये प्रवेश करून खुर्च्यांची उलथापालट करत ग्राहकांना धक्काबुक्कीदेखील केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी नांगरे-पाटील यांना सांगितले होते.

टॅग्स :Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयTransferबदली