आदिवासी विकास आयुक्त कुलकर्णी यांची बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:27 IST2020-09-18T22:57:04+5:302020-09-19T01:27:52+5:30
नाशिक : राज्याचे आदिवासी विकास आयुक्त डॉ. के.एच कुलकर्णी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच्.एस सोनवणे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.

आदिवासी विकास आयुक्त कुलकर्णी यांची बदली
नाशिक : राज्याचे आदिवासी विकास आयुक्त डॉ. के.एच कुलकर्णी यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच्.एस सोनवणे यांची नियुक्ति करण्यात आली आहे.
राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरुच असून शुक्रवारी राज्यशासनाने राज्यातील आय ए.एस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले. त्यात आदिवासी विकास आयुक्त डॉक्टर कुलकर्णी यांची बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांना अद्याप नव्या नियुक्तिचे ठिकाण कळविन्यात आलेले नाही. कुलकर्णी यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.
पुणे येथील झोपड़पट्टी पुनरवसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एस.जी कोलते यांच्या कड़े पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार सोपविन्यात आला आहे. तर आर.व्ही निबाळकर यांची कोलते यांच्या जागेवर नियुक्ति करण्यात आली आहे.
नवे आदिवासी विकास आयुक्त सोमवारी पदभार स्विकारण्याची शक्यता आहे.