आत्तापर्यंत ११० एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 01:07 IST2021-12-11T01:06:52+5:302021-12-11T01:07:10+5:30

नाशिक : संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवरील बदल्यांची कारवाई सुरूच असून, शुक्रवारी आणखी दहा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. नाशिक ...

Transfer of 110 ST employees till date | आत्तापर्यंत ११० एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

आत्तापर्यंत ११० एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवरील बदल्यांची कारवाई सुरूच असून, शुक्रवारी आणखी दहा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. नाशिक विभागातून बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सख्या आता ११० इतकी झाली आहे. दरम्यान, संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी या कारवायांनंतरही संप सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. एस. टी. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर महामंडळाकडून अनेक कारवाया केलेल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास ३०० कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर २० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांवरील बदल्यांची कारवाई अजूनही सुरूच असून, आत्तापर्यंत ११० कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, परिवहनमंत्र्यांनी कामगारांना सोमवारी कामावर परतण्याचे अल्टिमेटम दिले असून, सोमवारनंतर प्रशासन काेणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Web Title: Transfer of 110 ST employees till date