देवळा-खर्डे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:30 IST2020-06-13T22:17:34+5:302020-06-14T01:30:24+5:30

खर्डे : येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरील देवळा - खर्डे रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, त्यामुळे सातत्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.

Traffic was disrupted due to potholes on Deola-Kharde road | देवळा-खर्डे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत

देवळा-खर्डे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत

खर्डे : येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरील देवळा - खर्डे रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून, त्यामुळे सातत्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.
देवळा येथील प्रशासकीय इमारतीच्या समोरील देवळा - खर्डे रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. या खड्ड्यात रोजच वाहने आदळत आहेत. यामुळे वाहनांची नासधूस तसेच शारीरिक त्रास होत असल्याची
तक्र ार नागरिकांनी केली आहे.
हा रस्ता वर्दळीचा असल्याकारणाने याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ दखल घेऊन, सदर खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Traffic was disrupted due to potholes on Deola-Kharde road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक