वाहतूक नियमांची पायमल्ली
By Admin | Updated: April 29, 2017 02:10 IST2017-04-29T02:10:19+5:302017-04-29T02:10:28+5:30
इंदिरानगर : सह्याद्री रुग्णालयालगतच्या सिग्नल यंत्रणेवर वाहतूक पोलीस कर्मचारीअभावी वाहनधारकांकडून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे.

वाहतूक नियमांची पायमल्ली
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरीत साईनाथनगर चौफुली आणि सह्याद्री रुग्णालयालगतच्या सिग्नल यंत्रणेवर वाहतूक पोलीस कर्मचारीअभावी वाहनधारकांकडून नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. सिग्नल यंत्रणेचे नियम कुणीही पाळत नसल्याने लहान-मोठे अपघात घडत असून, हमरी-तुमरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या दोन्ही ठिकाणांची सिग्नल यंत्रणा शोभिवंत वस्तू बनली आहे.
साईनाथनगर चौफुलीजवळ शनिमंदिर जॉगिंग ट्रॅकमार्ग, मुंबई-आग्रा महामार्ग, डीजीपीनगर क्रमांक १, पुना महामार्ग आणि वडाळा-पाथर्डी रस्ता असे चार मुख्य रस्ते एकत्र येतात. त्यामुळे दिवसभर वाहनांची वर्दळ असते. तसेच सह्याद्री रुग्णालय लगतच्या चौफु लीवर मुंबई- आग्रा महामार्गाकडून भाभानगर, वडाळा नाका, पुना महामार्गाकडून आणि वडाळा-पाथर्डी रस्ता असे चार मुख्य रस्ते एकत्र येतात, त्यामुळे येथेही दिवसभर वाहनांची वर्दळ असते. या दोन्ही चौफुली ओलांडण्यासाठी सर्वच वाहनधारकांची घाई असते. त्यामुळे लहान- मोठ्या अपघातांबरोबरच जीवितहानी होत आहे. (वार्ताहर)