बोगद्याऐवजी अन्यत्र वाहतूक कोंडी

By Admin | Updated: July 21, 2015 00:29 IST2015-07-21T00:28:57+5:302015-07-21T00:29:34+5:30

बोगद्यात वाहतूक बंदी : मुंबईनाका, मायको सर्कलचा विळखा वाढला

Traffic restriction elsewhere instead of tunnels | बोगद्याऐवजी अन्यत्र वाहतूक कोंडी

बोगद्याऐवजी अन्यत्र वाहतूक कोंडी

नाशिक : इंदिरानगर ते गोविंदनगरला जोडणारा बोगदा बंद करून त्याठिकाणच्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यात धन्यता मानणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या मेहेरबानीने मुंबईनाका, मायको सर्कल या मुख्य रस्त्यांवर गेल्या चार दिवसांपासून सकाळ-सायंकाळ वाहतुकीची मोठी कोंडी होऊ लागली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मुंबईकडून येणारे व इंदिरानगरकडे जाऊ पाहणाऱ्या वाहनांमुळे तसेच इंदिरानगरकडून गोविंदनगरकडे जाणाऱ्या वाहनांमुळे बोगद्याच्या तोंडाशी वाहतुकीची कोंडी होत असल्याने व ही कोंडी त्या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी (?) नेमलेल्या वाहतूक पोलिसांकरवीही सुटत नसल्याने अखेरचा पर्याय म्हणून बोगदाच वाहनांसाठी बंद करण्याचा निर्णय पोलीस यंत्रणेने घेतला. त्यामुळे आता मुंबईकडून येणाऱ्या; परंतु इंदिरानगरकडे जाऊ पाहणाऱ्या वाहनांना मुंबईनाक्याला वळसा घेण्याशिवाय पर्यायच शिल्लक नाही, तर गोविंदनगरकडे येणाऱ्या वाहनांनाही एकतर समांतर रस्त्याने मुंबई नाक्याला वळसा घालून पुन्हा समांतर रस्त्याने गोविंदनगर गाठावे लागत आहे. त्यामुळे सकाळ व सायंकाळ मुंबईनाक्यावर पुन्हा एकवार वाहतूक कोंडी होऊ लागली असून, गोविंदनगरचा बोगदा बंद झाल्याने इंदिरानगरकडून थेट गोविंदनगर, कर्मयोगीनगर, मनोहरनगर मार्गे उंटवाडी व सातपूरकडे जाणाऱ्या वाहनांनाही आता मुंबईनाक्याचाच पर्याय असल्यामुळे पुढे ही वाहने मायको सर्कलजवळ येऊन वाहतूक कोंडीत भर टाकत आहेत. मायको सर्कलला वळसा घालूनच सातपूर, कॉलेजरोड, गंगापूररोडकडे मार्गस्थ होत असल्यामुळे सकाळी व सायंकाळी मायको सर्कलभोवती वाहनांची गर्दी होत आहे.

Web Title: Traffic restriction elsewhere instead of tunnels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.