शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंत वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:17 IST

शहरातील प्रमुख मार्ग असलेला मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंतच्या रस्त्यामध्येच रिक्षा, दुचाकी आदी वाहने, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होऊन जनतेस मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गासह किदवाई रोड, सरदार चौक, रामसेतू आदी प्रमुख मार्गांवरदेखील वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब तसेच वाहनांना त्वरित हटवावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.

मालेगाव : शहरातील प्रमुख मार्ग असलेला मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंतच्या रस्त्यामध्येच रिक्षा, दुचाकी आदी वाहने, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होऊन जनतेस मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गासह किदवाई रोड, सरदार चौक, रामसेतू आदी प्रमुख मार्गांवरदेखील वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब तसेच वाहनांना त्वरित हटवावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.प्रमुख मार्गांवर बेशिस्त वाहने व हातगाड्या लावण्यासह रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या पथदीपांमुळे वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहे. वाहतूक कोंडी निर्माण करणारे अडथळे दूर करण्यात यावे, मोसमपूल ते टेहरे चौफुली तसेच इतर प्रमुख रस्त्यांच्या मधोमध असलेले पथदीप व रोहित्र, रिक्षा व हातगाड्या लावल्या जात असल्यामुळे सदर प्रमुख मार्ग या अतिक्रमणांमुळे अरूंद झाल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होऊन जनतेस त्रास सहन करावा लागत आहे. मोसमपूल ते टेहरे चौफुली, रावळगाव नाका ते चर्चागेट, सोमवार बाजार, शहरातील सरदार चौक, किदवाईरोड, नवीन बसस्थानक आदी प्रमुख मार्गांवरदेखील अशीच परिस्थिती असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनला आहे. या मार्गावर अनेक रुग्णालये आहेत. वाहतूक कोंडी झाल्यास वाहने कर्णकर्कश आवाज करतात, त्याचा त्रासदेखील रुग्णांना होत आहे. शहरातील प्रमुख मार्गांची अशीच अवस्था निर्माण झाली असून, त्याकडे मनपा व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष जनतेत असंतोष निर्माण करणारे ठरत असल्याने संबंधित विभागांनी वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब त्वरित दूर करावेत.  मोसमपूल ते टेहरे चौफुली या मार्गावर दिवसरात्र वाहतुकीची वर्दळ असते; मात्र रस्त्याच्यामध्ये असलेले पथदीप व ट्रान्सफार्मर, बेशिस्तपणे उभी केली जात असलेली वाहने व हातगाड्यांमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले आहेत. दुपारी व सायंकाळी या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते. यामुळे अपघाताचे प्रकारदेखील वाढून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. वाहतूक शाखेचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असताना बेशिस्त वाहनांवर कारवाई करणे टाळले जाते.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस