महामार्गावर गॅस टॅँकर उलटल्याने वाहतूक ठप्प
By Admin | Updated: July 24, 2015 00:25 IST2015-07-23T23:54:19+5:302015-07-24T00:25:27+5:30
महामार्गावर गॅस टॅँकर उलटल्याने वाहतूक ठप्प

महामार्गावर गॅस टॅँकर उलटल्याने वाहतूक ठप्प
घोटी : मुंबई- आग्रा महामार्गावर घोटीजवळ गुरुवारी सायंकाळी नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या गॅस टॅँकरला अपघात झाल्याने तो रस्त्यावर पलटी झाला. त्यामुळे नाशिकहून मुंबईला जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. घोटी पोलिसांनी ही वाहतूक दुसऱ्या रस्त्यावरून वळवित हा अपघातग्रस्त टॅँकर हटविल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली.
गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास नाशिकहून मुंबईला भारत गॅसचा एमएच ०६, एक्यू-७३२४ या
क्रमांकाचा रिकामा टॅँकर जात असताना घोटीजवळील नटराज हॉटेलच्या समोरील उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो दुभाजकावर चढल्याने पलटी झाला. त्यामुळे मुंबईला जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. याबाबतची माहिती स्थानिक व्यावसायिकानी घोटी पोलिसांना कळविल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, अभिजित खंडरे, शिरीष अमृतकर यांनी अपघातस्थळी येऊन ठप्प झालेली वाहतूक पूर्ववत सुरू केली. (वार्ताहर)