शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
8
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
9
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
10
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
11
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
12
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
13
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
14
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
15
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
16
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
17
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
18
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

वाहतूक कोंडीने  येवलेकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:18 AM

स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. पण ट्रॅफिक जॅमचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे. येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

येवला : स्वच्छ शहर, सुंदर शहर, येवला शहर ही संकल्पना कागदावरच राहिली आहे. पण ट्रॅफिक जॅमचे शहर म्हणून ओळख व्हायला सुरु वात झाली आहे. येथील नगर-मनमाड रस्त्यावर येवला-विंचूर चौफुलीसह फत्तेबुरुज नाका, गंगा दरवाजा भागात चौफुलीवर सध्या कायम वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. अभावानेच पोलीस या ठिकाणी आढळतात. कोणीही यावं आणि कशीही गाडी रस्त्यावरून न्यावी. नगर- मनमाड राज्यमार्गावर येवला-विंचूर चौफुली या भागातून शहरात येण्यासाठी असलेला मार्ग सध्या सर्व्हे नंबर ३८०७ व ३९०९ या भागात गेल्या साडेतीन वर्षांपासून शॉपिंग सेंटरचे काम चालू असल्याने या भागातून शहराशी अनेकदा संपर्क तुटतो. त्याला पर्यायी मार्ग म्हणून लक्कडकोट देवी मार्गापासून वाहतूक वळविण्यात आली आहे. येवला-विंचूर चौफुली या भागातून नाशिक, नगर, औरंगाबाद, धुळे या चारही जिल्ह्यांतील वाहने जात असतात. सध्या तर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. नगर व औरंगाबाद येथून नाशिकला जाणारी वाहने जाताना वाहनचालकांना शहरात लावलेल्या या अभिनंदनाच्या फलकाचा अडथळा येत असल्याने नाशिक रस्त्याकडे कसे वळावे हेच समजत नाही. वाहतूक करणाऱ्या गाड्या येथे उभ्या राहतात. अनेकदा मोठ्या गाड्यांना वळणदेखील घेता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. शहरातील या तीनही चौफुलींवर वाहतूक पोलीस २४ तास आवश्यक आहे. येथे पोलीस चौकी असून नसल्यासारखी आहे. येवला-विंचूर चौफुलीवर वाहनचालकास खाली उतरून वाहतूक नियमन करावे लागते व स्वत:सह आपल्या वाहनाची सुटका करून घ्यावी लागते, असे चित्र अनेक वेळा पहावयास मिळते. येवला-विंचूर चौफुलीवर सिग्नलची अत्यंत आवश्यकता आहे. या चौफुलीवर मध्यभागी पोलिसांना वाहतूक नियमन करण्यासाठी शेड नाही. त्यामुळे पोलीसदेखील याठिकाणी वाहतूक नियमनासाठी उभा राहू शकत नाही, पण याचा विचार कधी झाला नाही. शहरात अनेक समाजसेवी संस्था आहेत, त्यांच्या सहकार्याने शेड तयार करता येऊ शकते. या साºया वाहतुकीच्या कोंडीतून व अडथळ्यांमधून येवलेकरांची सुटका कोण करील? याच्या प्रतीक्षेत नागरिक  आहेत.सीसीटीव्ही बंदरायगड ग्रुपच्या माध्यमातून सुमारे ६० हजार रु पये खर्च करून अद्ययावत अशी हाय डेफिनेशन व नाइटव्हिजन कॅमेरायुक्त सीसीटीव्ही यंत्रणा विंचूर चौफुलीवर शहर पोलिसांना उभारून दिली. या यंत्रणेचा लाभ गुन्हे तपासासाठी होणार असला तरी काहींची या सीसीटीव्ही कॅमेºयांवर नजर आहे, या विचारानेच अवसान गळायचे. ही यंत्रणा सध्या पूर्णपणे बंद असल्याची माहिती आहे. शिवाय येवला-विंचूर चौफुलीसह पारेगाव रस्त्याच्या वळण मार्गावर वाहतूक सिग्नल बसवावेत, अशी अनेक दिवसांची मागणी आहे. या सिग्नलसाठी कोणी प्रायोजक होऊन निरपराध लोकांचे अपघातात जाणारे बळी थांबतील अशी अशा येवलेकरांना आहे. शहराबाहेरून बायपास काढण्याच्या हालचाली झाल्यात, परंतु येवल्यात अडथळा आणणारे कमी नाहीत. तांत्रिक मुद्दे उपस्थित करून एखादे काम कसे लांबणीवर टाकायचे याबाबत माहीर असणाºया काही धुरिणांनी हे काम लांबविले आहे. आता येवल्याला मंत्रिपद नाही, त्यामुळे हा प्रश्न काही तत्काळ सुटण्यासारखा नाही. केवळ ट्रॅफिक सिग्नल, २४ तास वाहतूक पोलीस यामुळे फरक पडेल.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी