शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

ब्रिटिशकालीन धोकादायक पुलामुळे वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:18 IST

नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गंगाम्हाळुंगी, ओझरखेड यांसह परिसरातील सात-आठ गाव-वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर गंगापूर धरणाच्या मागील पाणवठ्यावरील अतिप्राचीन नादुरु स्त व कमकुवत असलेल्या ब्रिटिशकालीन पुलामुळे आणि येथील रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे.

गंगापूर : नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गंगाम्हाळुंगी, ओझरखेड यांसह परिसरातील सात-आठ गाव-वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर गंगापूर धरणाच्या मागील पाणवठ्यावरील अतिप्राचीन नादुरु स्त व कमकुवत असलेल्या ब्रिटिशकालीन पुलामुळे आणि येथील रस्त्यांमुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. या भागात कधी एसटी बस येते तर कधी येत नाही, अशी अवस्था असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो.मैलोंमैल पायपीट करावी लागते तर कधी जीव धोक्यात घालून खासगी प्रवासी वाहतुकीने प्रवास करावा लागत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा याबाबत निवेदन देऊनही या पुलाची कुठल्याही प्रकारची दुरु स्ती न झाल्याने नागरिक वैतागले आहेत.ओझरखेड शिवारात कश्यपी व गोदेच्या संगमावर असलेला जुना अरुंद पूल अनेक वर्षांपासून अत्यंत जीर्ण धोकादायक अवस्थेत गेला आहे. एसटी महामंडळाचे बसचालक या पुलावरून बस घेऊन जाण्यास कचरतात. या भागातील गावांकडे जाणारी बस वाहतूक व अन्य दळणवळणाची साधने या इंग्रजकालीन अरुं द पुलामुळे संपूर्ण विस्कळीत झाली आहे. या पुलाचे बांधकाम व्हावे या कामी सार्वजनिक बांधकाम विभागाने कित्येक वेळा सर्व्हे केला मात्र पूल आजही धोकादायक स्थितीत असून शालेय विध्यार्थी, शेतमाल वाहतूक, कामगार, मजूर, गावकरी यांना गंगाम्हाळुंगी, ओझरखेड, शिवणगाव, गणेशगाव, नासलगाव, पिंपळगाव गरु डेश्वर अशा अनेक गावांना जाणारा मार्गच धोकादायक झाला आहे. यामुळे या भागात चालणारी एसटी महामंडळाची बससेवा बंद पडली आहे. याचा विपरीत परिणाम या भागातील दळणवळणावर झाला असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.गंगाम्हाळुंगी ग्रुप ग्रामपंचायत असून, आठ ते दहा हजार लोकवस्तीचे हे गाव आहे. ओझरखेड ते गंगाम्हाळुंगी रस्ता आजच्या स्थितीत अत्यंत दुरवस्थेत आहे. एकीकडे ओझरखेड शिवारातील अरुं द जुना धोकादायक पूल याकडे सार्वजनिक बांधकाम व आमदार खासदारांनी सातत्याने दुर्लक्ष केले असल्याने या भागातील शेती, शिक्षण व मोलमजुरी करणाऱ्या व्यवस्था अत्यंत अडचणीत आल्या आहेत. गंगापूर धरणाच्या मागील बाजूला असलेल्या ओझरखेड, गंगाम्हाळुंगी, राजेवाडी, शिवणगाव, गणेशगाव (ना.), गणेशगाव (त्रं.), पिंपळगाव गरुडेश्वर या भागातील शेतकरी, विद्यार्थी, मजूरवर्ग कामानिमित्त गिरणारे गावात ये-जा करतात. त्यांच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टिकोनातून या भागात एसटी महामंडळाचे अधिकारी बस सेवा सुरू करीत नाहीत़गिरणारे गावाकडे येणारा मार्गच अरुं द पूल व धोकादायक रस्त्यामुळे अडचणीत आला असून, या भागात चालणारी वाहतूक गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. विद्यार्थी व नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मैलोंमैल पायी चालत पंचक्र ोशीतील गावांना यावे लागते. यात वेळेसह मानसिक ताणही सहन करावा लागत आहे. याबाबत कार्यवाही करण्याची मागणी होत आहे़अत्यंत धोकादायक ठरलेल्या या पुलामुळे या भागात बस येत नाही़ दुर्दैवाने एखादी घटना घडली तर एसटी महामंडळावर त्याचे खापर फोडले जाण्याच्या भीतीने बस बंद आहे़ हा पूल फार जुना असून अरुंद आहे. या पुलावरून एकावेळेस एकच वाहन जाते दुसºया वाहनाला जाण्यास जागाच नसते. तसेच या पुलाच्या दोन्ही बाजूला कठडे तुटलेले असल्याने आणि रस्त्यांवर खड्डे असल्याने सर्व प्रकारच्या वाहनचालकांना जीव धोक्यात घालून वाहन चालवावे लागते. यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित हा पूल दुरु स्त करण्याची गरज आहे.- बाळासाहेब गभाले,माजी सदस्य, जिल्हा परिषदनाशिक जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्याला आजपर्यंत कुठलाही स्थानिक आमदार, खासदार मिळाला नाही. या भागाने नेहमी पूर्व पट्ट्यातील आमदार, खासदार निवडून दिले. यामुळे आमच्या गंगाम्हाळुंगी, ओझखेड भागातील वाहतूक दळणवळण व आमच्या नागरी समस्या कित्येक वर्ष सुटल्या नाही. बस बंद पडल्याने आम्हाला मैलोंमैल पायपीट करावी लागते. शाळेतील विद्यार्थ्यांनादेखील पायपीट करावी लागते हे दुर्दैव आहे.- रावजी फसाळे, नागरिक

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका