मुंबई आग्रा महामार्गावर घोटीजवळ वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 18:45 IST2020-12-26T18:44:56+5:302020-12-26T18:45:20+5:30
घोटी - मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी वैतरणा फाट्यावर कंटेनर पलटी झाल्याने काही वेळ वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.

मुंबई आग्रा महामार्गावर घोटीजवळ वाहतूक विस्कळीत
घोटी - मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी वैतरणा फाट्यावर कंटेनर पलटी झाल्याने काही वेळ वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. नाताळ व विकॅड असल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून वाहतूक मोठ्या प्रमानात सुरू आहे काल (दि २६) रोजी मुंढेगाव येथे सकाळी एक कंटेनरचा पलटी झाला असतानाच आज घोटी येथे वैतरणा फाट्यावर दोन कंटेनर नाशिकहून मुंबईला जात असताना पुढील कंटेनर वैतरणा फाटा येथे वळण घेत असतानाच मागील कंटेनर चालकाला वेग नियंत्रित न झाल्यानें पुढील कंटेनरवर जाऊन आदळल्याने पुढील कंटेनर जागीच पलटी झाला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान घोटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या माध्यमातून पलटी झालेले कंटेनर बाजूला काढले. यावेळी घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे व वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.