Traffic congestion due to the market for weeks | आठवडे बाजारामुळे वाहतूक कोंडी

मुंबई-आग्रा महामार्गापर्यंत विस्तारलेला आठवडे बाजार वाहतुकीस अडथळा ठरत आहे.

ठळक मुद्देओझर : बाजार यात्रा मैदानात भरविण्याची मागणी

ओझरटाऊनशिप : ओझरचा आठवडे बाजार दर मंगळवारी भरतो यातून मोठ्याप्रमाणावर उलाढाल होते परंतु हाच बाजार सध्या विक्र ेत्यांबरोबच बाजारकरू व नागरिकांसाठी जीवघेणा ठरू पाहत आहे बाजाराच्या दिवशी विक्र ेते महामार्गावर तुकाराम कॉम्प्लेक्स जवळ रस्त्यावर बसतात त्यामुळे गर्दी होऊन वाह तूक कोंडी असल्याने छोटा मोठा अपघात होऊ शकतो म्हणून आठवडे बाजार यात्रा मैदानात भरवावा अशी नागरिकांची मागणी आहे.
आठवडे बाजाराच्या दिवशी मुंबई आग्रा महामार्गावर अतिशय भयानक चित्र पहायला मिळते बाजारपेठे लगतचा मुख्य महामार्गावर अर्ध्याहुन अधिक जागेत सध्या विक्र ेत्यांनी ठाण मांडल्यामुळे प्रशासन झोपी गेले की काय असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.सतत होणारी वाहतूक कोंडी आण िमहामार्ग ओलांडणारे नागरिक जीवमुठीत धरून रस्ता ओलांडत असतात महामार्गाच्या उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने नेमका येथेच एकेरी मार्ग आहे.ग्रामपंचायत ने ग्रामसभेत ठरल्याप्रमाणे मारु ती वेस पासून जरी वाहतूक बंद केली असली तरी देखील बाणगंगा नदीवरील पुलाच्या कठड्यावर आता विक्र ेत्यांनी ठाण मांडले आहे. जागेच्या कमतरतेमुळे कसेबसे विक्र ेते भाजीपाला विकत आहे.त्यामध्ये महिला आपल्या लहान चिमुकल्यांबरोबर देखील भाजीपाला विकतात त्यात एखाद्याचा तोल गेला तर सुमारे २० फूटाहुन अधिक खोल असलेल्या पात्रात पडण्याची भीती देखील व्यक्त होत आहे.

 

Web Title: Traffic congestion due to the market for weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.