महामार्गावर वाहतूक कोंडी

By Admin | Updated: May 21, 2017 01:33 IST2017-05-21T01:33:03+5:302017-05-21T01:33:13+5:30

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी ते शिंदेगावपर्यंत वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब झाल्याने वाहनधारक, रहिवासी, दुकानदार त्रस्त झाले आहेत.

Traffic collision on the highway | महामार्गावर वाहतूक कोंडी

महामार्गावर वाहतूक कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी ते शिंदेगावपर्यंत वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब झाल्याने वाहनधारक, रहिवासी, दुकानदार प्रचंड त्रस्त झाले आहेत. याकडे लोकप्रतिनिधी, राज्य शासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिक - पुणे महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असून सिन्नर फाट्यापासून चेहेडी पुलापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले आहे. मात्र महामार्गालगतचे वृक्ष तोडण्यास अद्याप परवानगी न मिळाल्याने या भागातील चौपदरीकरणाचे काम रेंगाळलेले आहे. तर चेहेडी येथील दारणा नदीपुलापासून शिंदेगावापर्यंत चौपरीकरणाचे काम सुरू आहे. एका बाजूचा सर्व्हिसरोड अर्धवट झाल्याने तो अद्याप वापरात नाही.

Web Title: Traffic collision on the highway