शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

येवल्यातील गुजराथी समाजातील जया पार्वती व्रत परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 8:56 PM

येवला : उत्तम जीवनसाथी मिळावा, यासाठी आजही शेकडो वर्षांची परंपरा कायम ठेवत येवल्यातील लेवा पाटीदार गुजराथी समाजातील कुमारिका जया पार्वती व्रत श्रद्धेने करत आहेत.

येवला : उत्तम जीवनसाथी मिळावा, यासाठी आजही शेकडो वर्षांची परंपरा कायम ठेवत येवल्यातील लेवा पाटीदार गुजराथी समाजातील कुमारिका जया पार्वती व्रत श्रद्धेने करत आहेत. आषाढ शुद्ध त्रयोदशीपासून सुरू झालेल्या या व्रताची सांगता पाच दिवसांच्या उपवासानंतर होते. पुराणात भगवान विष्णू यांनी माता लक्ष्मीला या व्रताबद्दल माहिती दिली असल्याचे सांगितले जाते. या व्रतात जया पार्वतीचे पूजन केले जाते. देशातील अनेक राज्यात पुत्रप्राप्ती, अखंड सौभाग्यप्राप्ती यासाठी हे व्रत केले जाते. मात्र, येवला येथील लेवा पाटीदार गुजराथी समाजातील कुमारिका उत्तम जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. लेवा पाटीदार गुजराथी समाजात या व्रताच्या प्रारंभी पहाटे शिव-पार्वती देवतेला आवाहन करून त्यांची स्थापना केली जाते. पूजेत गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग या पाच धान्यांची रोपे असलेल्या दोन टोपल्या स्थापन केल्या जातात. त्याचे विधिवत पूजन करून अभिषेक केला जातो. नंतर हळद-कुंकू, अष्टगंध, अक्षता, फुले, फळे, सुकामेवा अर्पण करून धूप, दीप आणि नैवेद्य दाखवला जातो. यानंतर जया पार्वती व्रताच्या कथेचे वाचन केले जाते. आरती करून प्रसाद वाटला जातो. हे व्रत करताना सलग पाच दिवस कुमारिका कोणतेही एक धान्य तेही मीठ न टाकता दिवसातून एकच वेळा जेवण करतात. गरज भासल्यास इतर वेळी मात्र प्रसादातील फळे व सुकामेवा फराळ म्हणून दिला जातो.आषाढ शुद्ध त्रयोदशी ते आषाढ कृष्ण तृतिया यादरम्यान हे व्रत केले जाते. कृष्ण तृतियेला या व्रताची सांगता होते. सांगतेप्रसंगी जाईजुई इतर फुलांच्या कळ्यांचा वापर करून सुंदर मुकुट तयार केला जातो. यावर मोर, हंस, पोपट, हत्ती, कमळाचे फूल अशा विविध सुंदर कलाकृती साकारल्या जातात. याबरोबरच वेणीस विशेष महत्त्व देऊन सजवले जाते. शिवाय गळ्यातील हार, मनगटी, बाजुबंद, कर्णफुले, कंमरपट्टा, पैंजण विशेष म्हणजे हा सर्व शृंगार फक्त फुलांच्या कळ्यांच्या वापर करून केला जातो. रेशमी वस्त्रासह विविध आभूषणांनी कुमारिकेस सजवले जाते. व्रताच्या सांगतेप्रसंगी ज्येष्ठांचे आशीर्वाद व भेट वस्तू देण्यात येतात. गोड नैवेद्य वाटून जया पार्वती व्रताची सांगता होते.

टॅग्स :Nashikनाशिक