बाजार समितीत व्यवहार सुरू
By Admin | Updated: June 8, 2017 18:05 IST2017-06-08T18:05:17+5:302017-06-08T18:05:17+5:30
जनजीवन पूर्वपदावर, १५० क्विंटल शेतमाल दाखल

बाजार समितीत व्यवहार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचे वातावरण काही प्रमाणात निवळल्याने गुरु वारी सकाळी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी शेतमाल विक्र ीसाठी आणला होता. समितीत जवळपास १५० क्विंटल शेतमालाची आवक झाल्याची माहिती बाजार समितीत सचिव अरुण काळे यांनी दिली आहे.
विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि.१) संप पुकारला होता. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचा शेतमाल विक्र ीसाठी आणणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. बंदमुळे बाजार समितीत आठवडाभरापासून कोणत्याही प्रकारचा शेतमाल विक्र ीसाठी दाखल होत नसल्याने दैनंदिन कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.
गुरु वारी बाजार समितीत शेतमालाची आवक सुरू झाली, मात्र सकाळच्या सत्रात व्यापारी वर्गाने सहभाग घेतला नव्हता. शेतकऱ्यांनी विक्र ीसाठी आणलेल्या शेतमालाची किरकोळ भाजीपाला विक्रेते व बाजार समितीतील भरेकऱ्यांनी खरेदी केली. गुरु वारी बाजार समितीत कारली, वांगी, टमाटा, हिरवी मिरची, कोथिंबीर व अन्य काही पालेभाज्या विक्र ीसाठी दाखल झाल्या होत्या.