ट्रॅक्टर उलटून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 00:23 IST2019-07-19T00:22:44+5:302019-07-19T00:23:52+5:30

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील ठाणगाव-सिन्नर रस्त्यावर देवीच्या खिंडीत घाट रस्त्याच्या एका वळणावर ट्रॅक्टर उलटून एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.

Tractor reversed one killed | ट्रॅक्टर उलटून एक ठार

ट्रॅक्टर उलटून एक ठार

ठळक मुद्देयुवकास लुटले

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील ठाणगाव-सिन्नर रस्त्यावर देवीच्या खिंडीत घाट रस्त्याच्या एका वळणावर ट्रॅक्टर उलटून एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे.
किरण नामदेव बिन्नर (१९) रा. हिवरे, ता. सिन्नर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ट्रॅक्टर कोण चालवित होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बाळकृष्ण सहाणे यांच्या मालकीचा हा ट्रॅक्टर बोरखिंड येथील वनविभागाच्या रोपवाटिकेतील रोपे घेण्यासाठी जात होता. ट्रॅक्टरमध्ये रोपे भरण्यासाठी ४-५ जण जात होते. देवीच्या खिंडीत एका वळणावर नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. यात ट्रॅक्टरखाली दबल्याने किरण यांचा मृत्यू झाला. ट्रॉलीत बसलेले ४-५जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सिन्नर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
युवकास लुटले
नाशिक : सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील अशोकनगर भागातील कार्बन नाक्यावर एका युवकास दोघा संशयितांनी मारहाण करून पाच हजारांची लूट केल्याची घटना घडली. या प्रकरणी केतन सुरेंद्र पवार (३३, रा. अशोकनगर) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार संशयित भटू दंडगव्हाळ आणि राहुल नरवाळ या दोघांविरोधात जबरी चोरीची फिर्याद दाखल पोलिसांनी दाखल केली आहे. केतन पवार हे कंपनीतून सायकलवरून सोमवारी (दि. १५) रात्री घरी जात होते. त्यावेळी संशयित भटू आणि राहुल यांनी केतनला अडवून चाकूचा धाक दाखवला. तसेच केतनला मारहाण करत पाच हजारांची रोकड हिसकावून दोघांनी दुचाकीवरून पळ काढला.

Web Title: Tractor reversed one killed

टॅग्स :Accidentअपघात