मालेगाव : चंदनपुरी शिवारातील नवीन गिरणा पुलावर ट्रॅक्टरला अॅपेरिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक ठार झाला, तर चार जण जखमी झाले. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक योगेश सुभाष पवार, रा. येसगाव याच्याविरुद्ध किल्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.शनिवारी (दि. २२) सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अरुण रमेश नवरे (३१) रा. दसाणे यांनी फिर्याद दिली. योगेश पवार याने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरला (क्र. एमएच ४१ एझेड ४७५५) भरधाव वेगात चालवून अचानक हळू करून डाव्या बाजूला घेतल्याने पाठीमागून येणारी अॅपेरिक्षा (क्र. एमएच ४१ सी ४४५५) मागील बाजूस धडकून झालेल्या अपघातात अॅपेरिक्षाचालक विकी संतोष अहिरे (२२) रा. करंजगव्हाण हा जखमी होऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अपघाताची खबर न देता पळून गेला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.
ट्रॅक्टरची धडक; अॅपेरिक्षाचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:11 IST
मालेगाव : चंदनपुरी शिवारातील नवीन गिरणा पुलावर ट्रॅक्टरला अॅपेरिक्षाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक ठार झाला, तर चार जण जखमी झाले. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक योगेश सुभाष पवार, रा. येसगाव याच्याविरुद्ध किल्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रॅक्टरची धडक; अॅपेरिक्षाचालक ठार
ठळक मुद्देकिल्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.