करवाढीविरोधात राष्टÑवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 01:07 IST2018-02-28T01:07:15+5:302018-02-28T01:07:15+5:30

नाशिक : महापालिकेने केलेल्या करवाढीविरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि.२७) पूर्व विभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

Towards the rise in the economy, the Plaintiff's Front | करवाढीविरोधात राष्टÑवादीचा मोर्चा

करवाढीविरोधात राष्टÑवादीचा मोर्चा

ठळक मुद्देपूर्व विभागीय कार्यालयावर मोर्चा दरवाढ करून नागरिक वेठीस

नाशिक : महापालिकेने केलेल्या करवाढीविरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि.२७) पूर्व विभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी विभागीय अधिकाºयांना निवेदन देण्यात येऊन करवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने करवाढीविरोधात विभागीय कार्यालयांवर मोर्चे नेले जात आहेत. त्यानुसार, मंगळवारी पक्षाचे प्रदेश पदाधिकारी नाना महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पूर्व विभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. महापालिकेला उत्पन्नाचे अनेक स्रोत उपलब्ध असताना घरपट्टीत दरवाढ करून नागरिकांना वेठीस धरले जात आहे. सदर वाढीव करवाढ तातडीने रद्द करावी अन्यथा राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मोर्चात राष्टÑवादीचे गटनेता गजानन शेलार, नगरसेवक समीना मेमन, सुषमा पगारे, शोभा साबळे तसेच रऊफ पटेल, सलीम शेख, संजय खैरनार, मुजाहिद शेख, आसिफ जानोरीकर, महेश भामरे, संजय साबळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Web Title: Towards the rise in the economy, the Plaintiff's Front