मंत्रिमहोदयांच्या स्वागताला ‘गटबाजीचे तोरण
By Admin | Updated: December 23, 2014 00:15 IST2014-12-23T00:06:38+5:302014-12-23T00:15:23+5:30
’वर्चस्वासाठी प्रदर्शन : कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन अवघड

मंत्रिमहोदयांच्या स्वागताला ‘गटबाजीचे तोरण
सिन्नर : भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारमध्ये शिवसेना पक्ष सहभागी झाला असला तरी स्थानिक पातळीवर उभय नेते व कार्यकर्त्यांमध्ये असलेली गटबाजी लपून राहिली नाही. याचा प्रत्यय गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांना सिन्नर येथे स्वागताप्रसंगी आला.शिंदे यांचा सत्कार करुन छायाचित्र काढण्यासाठीही उभय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ दिसून आली.
गृहराज्यमंत्री प्रा. शिंदे मुंबईकडे जात असतांना कार्यकर्त्यांच्या आग्रहखातर सत्कार स्विकारण्यासाठी ते काही मिनिटांसाठी येथील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. शिंदे सत्कार स्विकारण्यासाठी थांबणार असल्याचे समजल्यानंतर भाजपा, शिवसेना, रासपा व धनगर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विश्रामगृहाच्या आवारात गर्दी केली होती. शिंदे यांचे आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी भाजपा, शिवसेना, रासपा व धनगर समाज संघटना यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ दिसून आली. मात्र या सर्वांचे वेगवेगळे गट असल्याचे लपून राहिले नाही. धनगर समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांचा सर्वप्रथम सत्कार केला. नवनाथ मुरडनर यांनी शिंदे यांना पिवळा भंडारा लावून पुष्पगुुच्छ देत त्यांचे स्वागत केले. यानंतर सत्कारासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते पद्माकर गुजराथी, गंगाधर वरंदळ यांना सत्कारासाठी संधी देण्यात आली. भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण यांनी ‘पक्षाचा सत्कार अगोदर घ्या’ असा सूर लावला वाजे यांनीही अगोदर पक्षाचा सत्कार स्विकारा भाजपा पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांचा सत्कार केल्यानंतर आमदार वाजे पुढे आले व त्यांनी सेना कार्यकर्त्यांसह शिंदे यांचा केला.(वार्ताहर)