Towards ethanol formation of sludge | कादवाची इथेनॉल निर्मितीकडे वाटचाल
कादवा सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत बोलताना श्रीराम शेटे. समवेत व्यासपीठावर संचालक मंडळ.

ठळक मुद्देश्रीराम शेटे : वार्षिक सभेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखान्याचे उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव दिला असून भविष्यात केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणार नसून इथेनॉल निर्मिती करावी लागणार आहे. त्यादृष्टीने गाळप कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध मशिनरी बसवण्याचे काम सुरू असल्याची माहिती कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दिली.
कादवा सहकारी साखर कारखान्याची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष श्रीराम शेटे यांचे अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुरेश डोखळे, नरेंद्र जाधव, सचिन बर्डे, पप्पू मोरे, जे डी केदार यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी संजय पडोळ, तानाजी पगार,संजय कावळे,संपत कावळे, बबनराव देशमुख, प्रवीण पाटील, प्रशांत जमधडे, राजेंद्र उफाडे, विलास घडवजे आदींनी मनोगत व्यक्त केले.
संचालक शहाजी सोमवंशी यांनी आभार मानले. यावेळी मानले. यावेळी खासदार भारती पवार,आमदार नरहरी झरिवाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, उपजिल्हाप्रमुख अरुण वाळके, माजी सभापती सदाशिव शेळके, प्रकाश शिंदे, सर्व आजी, माजी संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. विरोधकांचा सभात्यागसंचालक मंडळाकडून गेल्या दोन वर्षात पुरविलेल्या उसाची आकडेवारी सांगत असतांनाच व्यक्तिश: नाव घेतल्याच्या कारणावरून कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तम भालेराव व सचिन बर्डे यांच्यात वाद झाल्याने सभेत काही काळ गोंधळ उडाला होता. नरेंद्र जाधव यांनी सदर वादाचा निषेध करत विरोधी नेत्यांसह सभात्याग केला.

Web Title: Towards ethanol formation of sludge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.