सुविधांअभावी पर्यटकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:10 PM2020-01-24T23:10:46+5:302020-01-25T00:16:09+5:30

वैतरणा धरण परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. परिसरात सोयीसुविधा करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

Tourist hiccups due to lack of facilities | सुविधांअभावी पर्यटकांचा हिरमोड

पर्यटकांना नेहमीच खुणावणारा वैतरणा धरण परिसर.

Next
ठळक मुद्देवैतरणा धरण परिसर : दर्शक फलक नसल्याने नाराजी

वैतरणानगर : वैतरणा धरण परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. परिसरात सोयीसुविधा करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.
महाराष्ट्रातील नामवंत धरण म्हणून वैतरणा धरण प्रसिद्ध आहे. याठिकाणी पर्यटनाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी हजारो पर्यटक येथे भेट देत असतात. मात्र परिसरात पर्यटकांना आवश्यक सोयीसुविधा, प्रसाधनगृह, पर्यटनाचे दिशादर्शक फलक नसल्याने येथे येणारे पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे. यामुळे वैतरणा धरण परिसरात येणारे पर्यटकांमध्ये दिवसेंदिवस घट होत असल्याचे चित्र दिसत आहे.
१९६२ साली वैतरणा धरणासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या. १९७२ साली धरणाचे काम पूर्ण झाले. परंतु गेल्या पन्नास वर्षात संपूर्ण वैतरणा परिसरात कुठल्याही सोयीसुविधा करण्यात आलेल्या नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील बहुतांशी धरण परिसरांचा योग्य तो विकास झाला आहे.
पर्यटकांसाठी सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाºया या महत्ताच्या अप्पर वैतरणा धरण परिसराचा विकास गेल्या पन्नास वर्षांपासून आजतागायत झालेला नाही. मुबलक पाणीसाठा असल्याने वैतरणा परिसराचा विकास होणे गरजेचे असताना हा परिसर उपेक्षित राहिला आहे.
वैतरणा धरण परिसराला नैसर्गिक सौंदर्य भरभरून लाभलेले आहे. धरण, डोंगररांगा, जंगल आदी नैसर्गिक धनसंपदा लाभलेली आहे. या अनुषंगाने आजपर्यंत अपेक्षित सुधारणा झालेल्या नसल्याने पर्यटक या परिसरात येऊन नाराजी व्यक्त करताना दिसत
आहेत.





प्रतिक्रि या
वैतरणा धरण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, मात्र येथे येणाºया पर्यटकांना योग्य सुविधा मिळत नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असतो. परीसरात कुठेही प्रसाधान गृह नसल्याने महिलांची गैरसोय होत असते. धरण परीसरात ठिकठिकाणी प्रसाधन गृह उभारणे गरजेचे आहे.
- विष्णु पा. पोरजे
(फोटो २३ वैतरणा)

Web Title: Tourist hiccups due to lack of facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.