शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

पर्यटन विकास महामंडळ : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर दरम्यान महिनाभरात जागा होणार निश्चित शंभर एकरमध्ये साकारणार ‘नाशिक वेलनेस हब’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 1:08 AM

नाशिक : पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या पर्यटनाच्या सुवर्णत्रिकोणामध्ये ‘नाशिक वेलनेस हब’ उभारले जाणार आहे.

ठळक मुद्देयेत्या २०२० पर्यंत वेलनेस हब साकारला जाणार आशियामधील सर्वाेत्तम सोयीसुविधा व उपचारपद्धती

नाशिक : आयुर्वेदापासून ते थेट ताणतणाव व्यवस्थापनासाठी ध्यानधारणेपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्य उपचारपद्धती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या पर्यटनाच्या सुवर्णत्रिकोणामध्ये ‘नाशिक वेलनेस हब’ उभारले जाणार आहे. या वेलनेस हबसाठी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरच्या दरम्यान येत्या महिनाभरात जागा निश्चित केली जाणार आहे. ‘मेडिकल टुरिझम’ला चालना देण्यासाठी तसेच नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या भागातील निसर्गसौंदर्य व आल्हाददायक वातावरणाचा लाभ घेत त्या भागातील पर्यटनव्यवसायला ‘बुस्ट’ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘नाशिक वेलनेस हब’चा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. येत्या २०२० पर्यंत वेलनेस हब साकारला जाणार असल्याचा विश्वास पर्यटन महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी व्यक्त केला. राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून आशियामधील सर्वाेत्तम सोयीसुविधा व उपचारपद्धतीच्या दृष्टीने व्यापक असे वेलनेस हब नाशिकमध्ये उभे राहणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पर्यटनाचा सुवर्णत्रिकोण अधिक विकसित होण्यास मदत होणार आहे. हे वेलनेस हब मुंबईपासून जवळ असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसमवेत विदेशी पर्यटकांनाही वेलनेस हब आक र्षित करणारा ठरणार असल्याचे राठोड म्हणाले. ताणतणावाचे व्यवस्थापन करत नैराश्यावर मात करता यावी, स्मरणशक्ती वृद्धिंगत व्हावी तसेच विविध आजारांवर आयुर्वेदिक, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, अ‍ॅक्युप्रेशर, अ‍ॅक्युपंक्चर, बॉडी मसाजसह ध्यानधारणा, योगा केंद्रासह विविध प्रकारच्या आरोग्याशी संबंधित सुविधा वेलनेस हबद्वारे पर्यटकांना एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे शंभर एकर जागेवर उभे राहणारे वेलनेस हब हे भारतातील पहिले हब ठरणार आहे.कारण एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये वेलनेस हब अद्याप कुठेही अस्तित्वात नाही. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पी.पी.पी) तत्त्वावर हे हब साकारले जाणार आहे.