शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अलबत्या-गलबत्यामधील वैभव मांगलेंच्या पडद्यामागील कलाकाराच्या बॅगा छूऽऽऽ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:43 IST

विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वीच कालिदास कलामंदिराचे नुतनीकरण करून अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्यात आले आहेत. या भागात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत तरीदेखील चोरट्याने हात साफ केला.

ठळक मुद्देचोरीच्या घटनेने कला क्षेत्रात एकच खळबळकालिदास कलामंदिराची वास्तू उत्कृष्ट; सुरक्षाव्यवस्था निकृष्ट

नाशिक : चेटकिनीची भूमिका साकारणाऱ्या वैभव मांगले यांच्या अलबत्या-गलबत्या या गाजलेल्या बालनाटकाचा प्रयोग सुरू असताना नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या वाहनतळात उभ्या असलेल्या मांगले यांच्या टीमच्या बसमधून दोन बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वीच कालिदास कलामंदिराचे नुतनीकरण करून अद्ययावत असे नाट्यगृह उभारण्यात आले आहेत. या भागात सुरक्षारक्षकांसह सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आले आहेत तरीदेखील चोरट्याने हात साफ केला. या चोरीच्या घटनेने कला क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.नाशिकला गुरूवारी अलबत्या गलबत्या हा धमाल उडविणारा नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानकपणे स्टेजजवळ वाहनतळात उभ्या असलेल्या बसमध्ये चोरटा शिरला आणि त्याने भर दुपारी दोन बॅगा पळवून नेल्या. चोरट्याचा हा प्रताप ‘तीसºया डोळ्यात’ कैद झाला असला तरी त्या डोळ्याच्या चित्रीकरणाची गुणवत्ता नसल्यामुळे पोलिसांना चोरट्याचा माग काढणे अवघड झाले असून चोरटा मोकाट आहे. या घटनेने पाहुण्या कलावंतांसह स्थानिक कलाक्षेत्रामध्येही नाराजी पसरली आहे.नाटकाच्या प्रयोगात दंग असलेल्या वैभव मांगले यांच्या टीमला गुरूवारी आलेला हा अनुभव अत्यंत वाईट स्वरूपाचा तर आहेच; मात्र नाशिकमधील ‘स्मार्ट झालेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या सुरक्षेविषयीदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा आहे. अलबत्या गलबत्यामधील पडद्यामागील कलाकार वैभव शिंदे तसेच बसचालकाची बॅग चोरट्याने लांबविली. सुदैवाने या बॅगांमध्ये मोठी रक्कम नव्हती; मात्र पारपत्र (पासपोर्ट) मोबाईलसह अन्य महत्त्वाच्या वस्तू चोरीस गेल्या आहेत. नाटकाचे निर्माते राहुल भंडारे यांनी याप्रकरणी तीव्र नाराजी दर्शविली असून महापालिका प्रशासन सुरक्षाव्यवस्थेबाबत चूक करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाकवी कालिदास कलामंदिराची वास्तू जरी उत्कृष्ट असली तरी येथील सुरक्षाव्यवस्था निकृष्ट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकmarathiमराठीartकलाvaibhav mangleवैभव मांगलेtheftचोरीPoliceपोलिस