लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 17:44 IST2019-07-16T17:44:33+5:302019-07-16T17:44:54+5:30

सिन्नर : लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी युवतीवर अत्याचार करणाऱ्या विवाहित तरूणाविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Torture of a woman by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

सिन्नर : लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी युवतीवर अत्याचार करणाऱ्या विवाहित तरूणाविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब पांडुरंग नाठे (३५) रा. कुंदेवाडी याने ओळखीचा फायदा घेऊन एका अल्पवयीन तरूणीवर तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. सन २०१६ ते मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले. तरूणीने पोलीस ठाण्यात येऊन त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. ती अल्पवयीन असल्याने बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत नाठे फरार असून, पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेंद्र रसेडे तपास करीत आहेत.

Web Title: Torture of a woman by showing lover of marriage