छेड काढल्याचा मनस्ताप; नांदगावी मुलीची आत्महत्या
By Admin | Updated: May 6, 2017 02:09 IST2017-05-06T02:09:16+5:302017-05-06T02:09:25+5:30
नांदगाव : छेड काढल्याचा मनस्ताप झालेल्या सतरावर्षीय अल्पवयीन मुलीने अगोदर विषप्राशन करत व नंतर विहिरीत उडी घेऊन जीवन संपविल्याचा प्रकार तांदूळवाडी येथे घडला.

छेड काढल्याचा मनस्ताप; नांदगावी मुलीची आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : छेड काढल्याचा मनस्ताप झालेल्या सतरावर्षीय अल्पवयीन मुलीने अगोदर विषप्राशन करत व नंतर विहिरीत उडी घेऊन जीवन संपविल्याचा प्रकार तांदूळवाडी येथे घडला. संशयित संगम गायकवाड याच्याविरु द्ध गुन्हा दाखल झाला असून तो फरार झाला आहे.
तांदूळवाडी येथील लहानू चंद्रभान काळे यांच्या कुटुंबातील सदस्य लग्नानिमित्त दऱ्हेल येथे गेले होते. त्यांची मुलगी पूनम ऊर्फ मंगल घरी एकटीच होती. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास संगम याने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. पूनमचे वडील घरी परतत असताना त्यांना घरातून नाल्याच्या दिशेने एक जण पळून जात असल्याचे व पूनम रडत असल्याचे दिसले. त्यांनी विचारणा केली असता पूनमने घडला प्रकार सांगितल्यानंतर वडिलांनी तीची समजूत काढत ते शेतात निघून गेले. अन्य सदस्य घरी परतले असता त्यांनी पूनमचा शोध घेतला असता सगुणाबाई वाघचौरे यांच्या विहिरीत पूनमचा मृतदेह आढळून आल्याने पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली.