लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:22 IST2017-07-21T00:22:06+5:302017-07-21T00:22:33+5:30

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

Torture by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : सोळा वर्षीय युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तरु णाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार बुधवारी रात्री सोमपूर नजीक उघडकीस आला. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी तरु णाला अटक करून बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
वाघळे येथील सतरा वर्षीय तरु ण समाधान संतोष गायकवाड याने जवळच असलेल्या देवपूर येथील सोळा वर्षीय युवतीला प्रेमाच्या जाळयात अडकवले. काल रात्री पिडीत युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिला त्या तरु णाने सोमपूर येथे नेऊन जायखेडा रस्त्यावरील एका डाळिंब बागेत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. पिडीत युवतीने आरडाओरडा करून तिची सुटका केली. त्यानंतर सर्व प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला. मुलीच्या पित्याने पोलीस ठाणे गाठून त्या
तरु णाविरु द्ध तक्रर केली.
दरम्यान, जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी वाघळे येथे सापळा रचून त्या तरु णाला शिताफीने पकडले. अटक केलेल्या तरु णाला नाशिक येथील बाल सुधारगृहात रवानगी केली आहे.

Web Title: Torture by showing lover of marriage