शाळकरी मुलीला एकटे गाठून अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:25 IST2020-08-19T23:29:37+5:302020-08-20T00:25:51+5:30
नाशिकरोड : देवळालीगावातील एका अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनी सहा महिन्यापूर्वी सायकलवरुन घरी येत असताना अज्ञात इसमाने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी उघडकीस आला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञात नराधमाविरुद्ध बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळालीगाव परिसरात राहणा-या अल्पवयीन विद्यार्थीनीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फेब्रुवारी महिन्यात ती सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळेतून सायकलवर घरी येत होती. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिच्या सायकलला धक्का दिल्याने ती खाली पडले. यावेळी तोंडावर रुमाल बांधलेल्या नराधमाने अत्याचार केला. दरम्यान, ती बेशुध्द पडली असता नराधम त्याच अवस्थेत तिला सोडून फरार झाला. काही वेळेनंतर ती शुध्दीवर आली आणि कसेबसे घर गाठले. घरी आई वडिलांना सांगितले तर ते शिक्षण बंद करतील या भितीमुळे विद्यार्थिनीने कोणालाही काही सांगितले नाही. दोन आठवड्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास त्या पीडीत मुलीवर दुसऱ्यांदा अत्याचार झाला. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.