पेठ बालगृहातील मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:04 IST2017-07-19T00:03:45+5:302017-07-19T00:04:03+5:30
पोस्कोन्वये गुन्हा दाखल; अध्यक्षाची आत्महत्येची धमकी

पेठ बालगृहातील मुलीवर अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक जिल्हा आदिवासी महिला हक्क संरक्षण समिती संचलित पेठ येथील मुलींच्या बालगृहातील अल्पवयीन मुलीवर समिती अध्यक्षाच्या मुलानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे़ नासर्डी पुलावरील मुलींच्या शासकीय अनुरक्षणगृहात सज्ञान झाल्याने हलविण्यात आलेल्या पीडित मुलीने हा प्रकार अधीक्षकांना सांगितल्यानंतर त्यांनी मुंबई पोलीस ठाण्यात धाव घेतली़ या प्रकरणी संशयित अतुल शंकर अलबाड
विरोधात लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्हा आदिवासी महिला हक्क सरंक्षण समिती पेठ यांचे पेठला मुलींचे बालगृह आहे. या बालगृहात २०१३ मध्ये अनाथ पीडित मुलीस भरती करण्यात आले़ या बालगृहाच्या अध्यक्षांचा मुलगा अतुल अलबाड याने २०१५च्या दिवाळीत अत्याचार केल्याचे पीडितेने अध्यक्ष सुशीला अलबाड यांना सांगितल्ोही, मात्र त्यांनी तूच माझ्या मुलाच्या मागे लागण्याचा आरोप करून तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने संशयिताने वारंवार अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे़
शासनाच्या नियमानुसार पीडित मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिला नासर्डी पुलावरील मुलींच्या शासकीय अनुरक्षणगृहात बुधवारी (दि़१२) दाखल करण्यात आले़ या पीडित मुलीने अधीक्षक एस़ डी़ गांगुर्डे यांना आपल्यावरील अत्याचाराची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़ त्यांनी पीडित मुलीला सोबत घेऊन मुंबई नाका पोलीस ठाणे गाठले़ या पीडित मुलीने संशयित अतुल अलबाड विरोधात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला असून तो तपासासाठी पेठ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे़
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हपेठमधील बालगृहात आजमितीस ५६ विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत़ अधीक्षक गांगुर्डे यांच्याकडे पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनुसार संशयित अतुल अलबाडने आपल्याबरोबरच इतर मुलींवरही लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केला आहे़ त्यामुळे बालगृहातील या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़आत्महत्येची धमकी
अधीक्षक गांगुर्डे यांच्याकडे पीडित मुलीने तक्रार केल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे़ तसेच या पीडित मुलीच्या दाखल्यासाठी अधीक्षकांनी अध्यक्ष सुशीला अलबाड यांना फोन केला होता़ त्यांनी आपल्या मुलावर गुन्हा दाखल झाल्यास तुम्हा सर्वांची नावे चिठ्ठीत लिहून मी आत्महत्या करीन, अशी धमकी दिल्याचा लेखी अहवाल गांगुर्डे यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे व जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना दिला आहे.