शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ‘मशाल रॅली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:23 AM2020-02-19T02:23:50+5:302020-02-19T02:24:25+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडतर्फे सालाबादप्रमाणे जुन्या नााशिक महानगरपालिकेपासून मशाल रॅली काढून सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करून परिसर दणाणून सोडला.

'Torch Rally' on the eve of Shiv Jayanti | शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला ‘मशाल रॅली’

मशाल रॅली : शिवजंयीत निमित्ताने संभाजी ब्रिगेडच्यावतीने मंगळवारी मध्यरात्री मेनरोड येथून मशाल रॅली काढण्यात आली. यावेळी छत्रपाती शिवरायांचा जयघोष करण्यात आला.

googlenewsNext
ठळक मुद्देजागरण गोंधळ : मर्दानी खेळांनी वेधले लक्ष

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडतर्फे सालाबादप्रमाणे जुन्या नााशिक महानगरपालिकेपासून मशाल रॅली काढून सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करून परिसर दणाणून सोडला.
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडतर्फेशिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि.१८) रात्री ११ वाजेच्या सुमारास जुनी नाशिक महानगरपालिका मेनरोड येथून मशाल रॅलीला संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरुवात झाली. यावेळी मशाल रॅलीच्या मार्गात निवृत्ती मोरे यांच्या वाघ्या मुरळी पथकाने महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या जयघोष करीत जागरण गोंधळाचे सादरीकरण केले. त्याचप्रमाणे शिवजन्मोत्सवावर आधारित लोकगीतांचेही त्यांनी यावेळी सादरीकरण केले. मशाल रॅलीदरम्यान शिवप्रेमींनी लाठ्या काठ्या, बनाट्यांसारख्या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करताना नागरिकांचे लक्ष वेधून घेत मशाल रॅली मार्गात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याठिकाणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव नितीन रोठे पाटील, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे अजिज पठाण आणि संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रफुल्ल वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक शहराध्यक्ष प्रफ्फुल्ल वाघ यांनी केले. मराठा सेवा संघाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक भदाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.



यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील इंगळे, कार्याध्यक्ष विकी गायधनी, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र निंबाळदे, कॉम्रेड राजू देसले, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ जाधव, सचिन मोरे, अजय कोर, विकी ढोले आदी उपस्थित होते.

Web Title: 'Torch Rally' on the eve of Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.