शिक्षक मतदारसंघाची उद्या मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:22 IST2018-06-27T00:20:43+5:302018-06-27T00:22:29+5:30
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची गुरुवारी मतमोजणी करण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी मतमोजणीस्थळी मतमोजणी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिक्षक मतदारसंघाची उद्या मतमोजणी
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची गुरुवारी मतमोजणी करण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी मतमोजणीस्थळी मतमोजणी कर्मचारी, अधिकाऱ्यांचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या निवडणुकीसाठी सोमवारी नाशिक विभागात ९२.३५ टक्के मतदान झाले होते. विभागातील सर्व जिल्ह्यांमधून मतपेट्या पोलीस बंदोबस्तात नाशकात आणण्यात आल्या. शेवटची पेटी नंदुरबार जिल्ह्णातून मंगळवारी पहाटे ५ वाजता पोहोचली. या सर्व पेट्या अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊस येथे जमा करण्यात आल्या असून, याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात येईल त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी चार टेबल याप्रमाणे २०
टेबल लावण्यात येणार आहेत. या मतमोजणीची रंगीत तालीम व पूर्वतयारीचा भाग म्हणून बुधवारी दुपारी कर्मचारी, अधिकाºयांचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.