उद्या फ्रेण्डशिप डे

By Admin | Updated: August 6, 2016 01:21 IST2016-08-06T01:21:03+5:302016-08-06T01:21:18+5:30

उद्या फ्रेण्डशिप डे

Tomorrow is the Friendship Day | उद्या फ्रेण्डशिप डे

उद्या फ्रेण्डशिप डे

नाशिक : एकमेकांच्या मनगटांवर बांधले जाणारे फ्रेण्डशिप बॅण्ड... गप्पांची मस्त मैफल अन् साथीला हिरवागार निसर्ग... अशा वातावरणात उद्या (दि. ७) शहरातील तरुणाई मैत्री दिन साजरा करणार आहे. तरुणांमध्ये मैत्री दिनाच्या सेलिब्रेशनचे नियोजन सुरू असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘फे्रण्डशिप डे’ सेलिब्रेशनच्या चर्चा होताना दिसताहेत.
आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा केला जातो. विशेषत: महाविद्यालयीन तरुणाई हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा करतात. मित्र-मैत्रिणी एकत्र येऊन एकमेकांना ‘फ्रेण्डशिप बॅण्ड’ बांधून शुभेच्छा देतात. हा दिन साजरा करण्याचे नियोजन आज सुरू होते. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर आजपासूनच संदेशांची देवाणघेवाण सुरू झाली होती. गंगापूररोड, शरणपूररोड, कॉलेजरोड भागातील कॉफी शॉप, चाट सेंटर्स, स्नॅक्सची दुकाने,आइस्क्रीम पार्लर्स उद्या गजबजून जाणार असली तरी यंदाच्या ‘फ्रेण्डशिप डे’ वर पावसाचे सावट असल्याने तरुणाईमध्ये सेलिब्रेशनबाबत द्विधा मन:स्थिती आहे. ‘फे्रण्डशिप डे’निमित्त उद्या कॉलेजरोडसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
दरवर्षी सोमेश्वर, आसारामबापू पूल, धरण परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

Web Title: Tomorrow is the Friendship Day