उद्या दुपारी पंचवटीत पाणी नाही
By Admin | Updated: May 21, 2014 00:29 IST2014-05-21T00:02:18+5:302014-05-21T00:29:38+5:30
नाशिक : पंचवटी येथील मनपा जलशुद्धिकरण केंद्रात विद्युत रोहित्र जोडणीचे काम करायचे असल्याने महावितरणकडून येत्या गुरुवारी (दि. २२) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत वीजपुरवठा खंडित राहणार आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारनंतर पंचवटीच्या सर्व भागांत पाणीपुरवठा होणार नाही. महावितरणचे काम वेळेच्या आधी पूर्ण झाल्यास सायंकाळी पाणीपुरवठ्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.