टमाट्याला कवडीमोल भाव : तोडणी बंद करण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:22 IST2018-03-17T00:22:54+5:302018-03-17T00:22:54+5:30
बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम पट्ट्यात सध्या टमाट्याला घरातून पैसे टाकूनही केवळ तीन ते चार रुपये किलो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टमाट्याची तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे.

टमाट्याला कवडीमोल भाव : तोडणी बंद करण्याची वेळ
औंदाणे : बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागासह पश्चिम पट्ट्यात सध्या टमाट्याला घरातून पैसे टाकूनही केवळ तीन ते चार रुपये किलो बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना टमाट्याची तोडणी बंद करण्याची वेळ आली आहे. येथील ग्रामीण भागात औंदाणे, तरसाळी, भाक्षी, मुळाणे, मुंजवाड परिसरातील तळवाडे दिगर, किकवारी, दसाणे, केरसाणे, मोरकुरे, पठावे, डांगसौंदाणे, जोरण आदी गावांतील शेतकºयांनी टमाट्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड केली; मात्र सध्या टमाट्यास अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. या बाजारभावात शेतकºयाचा खर्चसुद्धा निघत नाही. शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कारण टमाट्याला औषध फवारणी, बांधणी, मिल्चिंग पेपर, तसेच मांडव व तोडणी असा एकरी एक लाख रुपये खर्च करूनही आज टमाट्याला तीन-चार रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्यामुळे शेतकºयांचा खर्चही निघत नाही. त्यामुळे टमाटे तोडून बाजारात विक्रीसाठी नेले असता त्याचा खर्च-सुद्धा निघत नाही व उलट शेतकºयांना पदरचे पैसे भरावे लागतात. गेली दोन-तीन वर्षं टमाटे पिकामध्ये शेतकºयांना फटका बसत आहे. हल्ली कोणत्याही कारणाने टमाट्याला भाव मिळत नाही. या पिकाला खर्च मोठ्या प्रमाणावर येतो. टमाटे हे नाशवंत पीक असल्यामुळे ते साठवून ठेवता येत नाही. बहुतेक शेतकºयांनी टमाट्याची शेतातील तोडणी बंद केली आहे. त्यामुळे शेतात टमाट्याचा खच पडला आहे.
सध्या तळवाडे दिगर व परिसरातील टमाटे उत्पादक शेतकरी आपला माल सूरत, नवापूर, नंदुरबार, मालेगाव, बिल्ली मोरा आदी शहरात विक्र ीसाठी नेत आहे. मात्र, तिथे प्रतिक्रेट्स (जाळी) सरासरी ५० ते ६० दर मिळत असून, माल नेण्याचे भाडे ४५ ते ५० रु पये त्यात तोलाई, वाराई, हमाली जाते.
शेतकºयांना टमाटे तोडणीसाठी १५ रु पये प्रतिक्रेट्स खर्च येतो म्हणजे ते बाजारात नेण्यासाठी ५० ते ६० रुपये खर्च येतो. तेवढाच भाव मिळत असल्यामुळे बाकीचा खर्च घरातून टाकण्याची वेळ आज टमाटे उत्पादक शेतकºयांवर आली आहे.