टमाट्याला कवडीमोल भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 00:09 IST2021-08-26T00:08:42+5:302021-08-26T00:09:26+5:30
येवला : टमाट्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील अंदरसुल येथील शेतकऱ्याने शहरातील विंचूर चौफुलीवर गाडीभर टमाटे ओतून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

टमाट्याला कवडीमोल भाव
येवला : टमाट्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने तालुक्यातील अंदरसुल येथील शेतकऱ्याने शहरातील विंचूर चौफुलीवर गाडीभर टमाटे ओतून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
शेतकरी धव यांनी एक एकर क्षेत्रामध्ये टमाटा पीक घेतले होते. टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला भाव मिळाला. मात्र बाजारात टमाट्याच्या एका कॅरेटला पंचवीस रुपये भाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकरी आदित्य जाधव यांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीस कॅरेट टमाटे रस्त्यावर ओतले. बाजार भाव पडल्याने वाहतूक खर्चही निघत नसल्याने टमाटे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.
टमाटे रोप खरेदी, लागवड, फवारणी, बांधणी, माल तोडणी, वाहतूक या सर्वांचा विचार केला तर सध्या मिळणार्या भावाने टमाटे उत्पादक शेतकरी तोट्यात आला आहे. सध्या बाजारात टमाट्याची मोठी आवक होत असून तुलनेत देशांतर्गतही मागणी घटली असल्याने बाजारभाव पडल्याचे सांगितले जात आहे.