सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे येथील टोल नाक्यावर तालुक्यातील स्थानिकांकडून आकारण्यात येणारा टोल हा अन्यायकारक असून तो आकारण्यात येऊ नये. या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने टोल नाका प्रशासनाला दिले. राष्ट्रवादी कॉँग्रेसने आक्रमक भूमिका घेत आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
संगमनेर व घोटीच्या धर्तीवर तालुक्यातील नागरिकांना समंजस भूमिका घेऊन टोल माफ करावा. नाशिक-पुणे महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शेतक-यांनी उदारमनाने अल्पदरात आपल्या जमिनी शासनाला उपलब्ध करून दिल्या आहेत. याची जाणीव ठेवून टोल माफीचा निर्णय १५ दिवसांत न घेतल्यास आमदार माणिकराव कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली हजारो नागरिकांना बरोबर घेऊन जनआंदोलन करू. या जनआंदोलनामुळे शिंदे टोल नाक्यावर निर्माण होणा-या परिस्थितीस सर्वस्वी टोल प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा बाळासाहेब वाघ यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, रस्ते विकास महामंडळ, नाशिक रोड पोलीस ठाणे, तहसीलदार आदींना देण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, नामदेव कोतवाल, विजय काटे, राजाराम मुरकुटे, रामा बुचुडे, योगेश माळी, वाळीबा गुरूकुले, नामदेव लोंढे, अशोक मोरे, सौरभ नाठे, रामभाऊ लोणारे, कन्हैयालाल भुतडा, सुदाम बोडके आदी उपस्थित होते.
-------------------
नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका प्रशासनाला निवेदन देताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, विठ्ठल उगले, नामदेव कोतवाल, विजय काटे, राजाराम मुरकुटे आदी. (१८ सिन्नर एनसीपी)
180921\18nsk_37_18092021_13.jpg
१८ सिन्नर एनसीपी