टोकडे शाळेच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST2021-02-05T05:37:00+5:302021-02-05T05:37:00+5:30
समाधान भुरा निमडे हे बीएबीएड असूनही त्यांनी गरजेपोटी डीएड. वेतनश्रेणीत शिक्षकपदी नियुक्ती स्वीकारली होती. त्यानंतर मात्र संस्थेच्या शाळेत बीए ...

टोकडे शाळेच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांचे उपोषण
समाधान भुरा निमडे हे बीएबीएड असूनही त्यांनी गरजेपोटी डीएड. वेतनश्रेणीत शिक्षकपदी नियुक्ती स्वीकारली होती. त्यानंतर मात्र संस्थेच्या शाळेत बीए बीएडची जागा रिक्त झालेली असताना निमडे यांना बीएबीएडची वेतनश्रेणी देणे क्रमप्राप्त होते. परंतु संस्थेने सुभाष धाडीवाल यांची थेट नियुक्ती बीएबीएड वेतनश्रेणीत करून निमडे यांच्यावर अन्याय केला. या संदर्भात शिक्षण उपसंचालकांनी निमडे यांच्याबाजूने निकाल देऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या निषेधार्थ निमडे यांनी उपोषण सुरू केेले आहे. तसेच याच संस्थेतील शिपाई असलेले पुनमचंद दराखा व सुरेश दराखा या दोन्ही शिपायांना बेकायदेशीर निलंबित करण्यात आले. या दोघांना पूर्ववत कामावर घेण्याचे आदेश माध्यमिक शिक्षण विभागाने देऊनही त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याच्या निषेधार्थ शिपायांनी उपोषण सुरू केले आहे. पाच दिवसांपासून उपोषण सुरू करूनही त्याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.