शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

नऊ महिन्यांत फक्त १५ लाभार्थींना शौचालयाचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:19 IST

एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छ भारत मिशनला महत्त्व दिले जात असताना, दुसरीकडे येथील स्थानिक प्रशासनाकडून शौचालय उभारणीचे काम फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आहे. गावपातळीवर ग्रामस्थांची उदासीनता, प्रशासनाचे गळचेपी धोरण व पदाधिकाºयांची अनास्था यामुळे नऊ महिन्यांत अवघ्या १५ लाभार्थींना शौचालयाचे अनुदान प्राप्त झाले आहे.

नांदूरशिंगोटे : एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून स्वच्छ भारत मिशनला महत्त्व दिले जात असताना, दुसरीकडे येथील स्थानिक प्रशासनाकडून शौचालय उभारणीचे काम फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याचे चित्र आहे. गावपातळीवर ग्रामस्थांची उदासीनता, प्रशासनाचे गळचेपी धोरण व पदाधिकाºयांची अनास्था यामुळे नऊ महिन्यांत अवघ्या १५ लाभार्थींना शौचालयाचे अनुदान प्राप्त झाले आहे.  जिल्ह्यातील प्रत्येक गाव हगणदारीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व शासनाकडून विविध प्रकारचे प्रबोधन करून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांच्या तालुका पातळीवर नेहमीच बैठका घेतल्या जातात. परंतु सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील परिस्थिती नेमकी वेगळी आहे. वरिष्ठ पातळीवरून सन २०११-१२ यावर्षी झालेल्या सर्व्हेवरून सन २०१७-१८ या वर्षात नांदूरशिंगोटे येथे ४६८ शौचालये उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. आजतागायत येथे २६३ शौचालयांची बांधकामे पूर्ण झाल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने पंचायत समितीकडे कळविले आहे, तर २०५ शौचालयांची बांधकामे अद्यापही अपूर्ण असल्याचे समजते.  स्वच्छ भारत मिशन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच त्यांना शौचालय उभारणीसाठी प्रोत्साहन दिले जाते. जी कुटुंबे आर्थिक परिस्थितीमुळे शौचालय उभारू शकत नाहीत अशा कुटुंबांना शौचालय उभारणीसाठी शासनाकडून बारा हजार रुपये याप्रमाणे अनुदानही देण्यात येत आहे. असे असताना येथे स्वच्छ भारत अभियान काही केल्या गती घेण्याचे नाव घेत नाही.  गावात २६३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण असताना नऊ महिन्यांत फक्त १५ लाभार्थींना अनुदान प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत स्तरावरून गेल्या नऊ महिन्यांत पंचायत समितीकडे फक्त ४७ प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यापैकी १५ नागरिकांना लाभ मिळाला आहे.  शौचालय बांधकाम पूर्ण असलेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतकडे कागदपत्रे जमा करून लाभ घ्यावयाचा आहे. परंतु याबाबत लाभार्थी व प्रशासन या दोघांकडूनही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे.  अनेक लाभार्थींना आपले नाव यादीत आहे किंवा नाही हे सुद्धा माहीत नाही. सध्या पंचायत समिती स्तरावर नांदूरशिंगोटे गावाचे ३२ प्रस्ताव शिल्लक असल्याचे समजते. एकीकडे शासन शेवटच्या घटकापर्यंत सर्वांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करत असताना येथे विचित्र परिस्थिती आहे. अनेक लाभार्थींनी शौचालय बांधकाम केले आहे परंतु ग्रामपंचायतीच्या उताºयावर (नमुना नंबर ८) शौचालयाची नोंद केलेली नसल्याने त्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. गाव पातळीवर ग्रामपंचायत प्रशासनाने जनजागृती करून प्रत्येक लाभार्थीस कसा लाभ दिला जाईल यासाठी नियोजन केले पाहिजे. तसेच काही गावांत ग्रामस्थ शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नेहमीच उदासीन असतात. त्यामुळे नागरिकांनीसुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. शौचालय उभारणीचे काम कासव गतीने सुरू राहिल्यास गाव हगणदारीमुक्त होण्यास वाट बघावी लागेल. गतवर्षी येथील ग्रामपंचायतीस प्रभारी ग्रामविकास अधिकारी नियुक्त होते. त्यामुळे कामकाजात मोठ्या प्रमाणात अनियमितता होती. जुलै महिन्यात नवीन ग्रामविकास अधिकारी यांनी पदभार घेतला आहे. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका संपन्न झाल्या. नोव्हेंबर महिन्यात सरपंचपदाचा पदभार घेतल्यानंतर ४० च्या आसपास प्रस्ताव तयार करून पाठवले आहेत. लाभार्थींना अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असून, आगामी काळात गाव हगणदरीमुक्त होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.       - गोपाळ शेळके, सरपंच, नांदूरशिंगोटे

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNashikनाशिक