त्रिकाल भवंता यांच्या दाव्याचा आज फैसला
By Admin | Updated: August 28, 2015 00:16 IST2015-08-28T00:16:37+5:302015-08-28T00:16:37+5:30
त्रिकाल भवंता यांच्या दाव्याचा आज फैसला

त्रिकाल भवंता यांच्या दाव्याचा आज फैसला
नाशिक : शाहीस्नानासाठी पर्वणीच्या दिवशी गोदावरीच्या काठावर साध्वींना स्नानासाठी स्वतंत्र जागा प्रशासनाने द्यावी, या मागणीसाठी साध्वी त्रिकाल भवंता यांनी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्यावर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महंतांच्या तिन्ही आखाड्यांसह जिल्हाधिकारी यांना पक्षकार म्हणून समाविष्ट केले असून, महापालिकेची पक्षकाराची मागणी फेटाळून लावली आहे. आज (दि.२८) सकाळी ११ वाजता यावर सुनावणी होणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये शाहीस्नानासाठी शैव-वैष्णव साधूंसाठी स्वतंत्ररीत्या जागेची व्यवस्था पेशव्यांकडून करण्यात आली; मात्र त्यावेळी साध्वींचा आखाडा अस्तित्वात नव्हता.