रामदेवबाबा यांचे आज सिन्नरला व्याख्यान

By Admin | Updated: September 19, 2015 22:17 IST2015-09-19T22:17:02+5:302015-09-19T22:17:32+5:30

रामदेवबाबा यांचे आज सिन्नरला व्याख्यान

Today's speech to Ramdev Baba | रामदेवबाबा यांचे आज सिन्नरला व्याख्यान

रामदेवबाबा यांचे आज सिन्नरला व्याख्यान


सिन्नर : योगगुरु रामदेव महाराज यांचे आज रविवारी (दि. २०) येथे ‘योगसे राष्ट्र निर्माण’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सिन्नर महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी पतंजली योगसमिती आणि भारत स्वाभिमान न्यासच्या वतीने करण्यात आली आहे. रामदेव महाराज कुंभमेळ्याच्या निमित्ताने श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आले आहेत. रविवारी सकाळी १० वाजता त्यांचे येथील सिन्नर महाविद्यालयाच्या मैदानावर प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी उपस्थितीत राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे प्रमुख आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. (वार्ताहर)

Web Title: Today's speech to Ramdev Baba