ओबीसी समाजाचा आज मूक मोर्चा

By Admin | Updated: October 2, 2016 23:42 IST2016-10-02T23:41:06+5:302016-10-02T23:42:11+5:30

ओबीसी समाजाचा आज मूक मोर्चा

Today's Silent Front of OBC Community | ओबीसी समाजाचा आज मूक मोर्चा

ओबीसी समाजाचा आज मूक मोर्चा

नाशिक : ओबीसी समाजाचा मोर्चा सोमवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. मोर्चात सुमारे दहा लाख समर्थकांचा सहभाग राहणार असल्याची शक्यता आयोजकांनी वर्तविली आहे. बहुजनांचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थनार्थ हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
तपोवनापासून मोर्चाला प्रारंभ होणार आहे. चव्हाण मळा, आइस फॅक्टरी, काट्या मारुती मंदिर, जुना आडगाव नाका, निमाणी बसस्थानक, पंचवटी कारंजा, मालेगाव बसस्थानक, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, एम. जी. रोड, मेहेर सिग्नल येथून जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा नेण्यात येणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. त्यासाठी जनजागृतीही करण्यात आली. शिवाय रॅली देखील काढण्यात आल्या असून ठिकठिकाणी बॅनरही लावण्यात आली आहेत. विविध संस्था, संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दर्शविला असल्याचे आयोजकांनी सांगितले. मोर्चाच्या पार्श्वभुमीवर वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Today's Silent Front of OBC Community