शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नाशिक, दिंडोरी मतदारसंघांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 1:06 AM

लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी या दोन मतदारसंघांबरोबरच धुळे मतदारसंघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघांत सोमवारी (दि.२९) मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी ४७२० मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

नाशिक : लोकसभेच्या नाशिकदिंडोरी या दोन मतदारसंघांबरोबरच धुळे मतदारसंघातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघांत सोमवारी (दि.२९) मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी ४७२० मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी ४५ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदान निर्भयपणे पार पाडण्यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.देशात होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी २ एप्रिलपासून नामांकन दाखल करण्यात आले. नाशिक मतदारसंघासाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, राष्टÑवादीचे समीर भुजबळ, बहुजन वंचित आघाडीचे पवन पवार, अपक्ष माणिकराव कोकाटे, वैभव अहिरे, सोनिया जावळे, विनोद शिरसाठ, शिवनाथ कासार, संजय घोडके, शरद आहेर, प्रकाश कनोजे, सिंधुबाई केदार, देवीदास सरकटे, धनंजय भावसार, प्रियंका शिरोळे, विलास मधुकर देसले, शरद धनराव व सुधीर देशमुख हे अठरा उमेदवार भवितव्य आजमावित आहेत. तर दिंडोरी मतदारसंघातून राष्टÑवादीकडून धनराज महाले, भाजपाच्या डॉ. भारती पवार, माकपाचे जिवा पांडू गावित, बहुजन वंचित आघाडीचे बापू बर्डे, अपक्ष अशोक जाधव, दादासाहेब पवार, दत्तू बर्डे, टी. के. बागुल हे आठ उमेदवार नशीब आजमावित आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यापासून सर्वच उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली होती. प्रमुख राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जिवाचे रान केले. राष्टÑीय व राज्यस्तरीय स्टार प्रचारकांच्या जाहीरसभा, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीने जिल्ह्यात राजकीय वातावरण तप्त झाले होते.  शनिवारी सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचाराची सांगता करण्यात आली. त्यानंतर उमेदवार गेल्या दोन दिवसांपासून राजकीय डावपेच, व्यूहरचना आखण्यात दंग होते.प्रशासकीय यंत्रणा सज्जसोमवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील ४७२० मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात येणार असून, नाशिक जिल्ह्यात ४५ लाख ०५ हजार ३२० मतदार आहेत. त्यात २३ लाख ५८ हजार ६६० पुरुष व २१ लाख ४६ हजार ५६८ महिला मतदारांची संख्या असून, ९२ तृतीयपंथी मतदार आपला हक्क बजावतील. एका मतदान केंद्रावर १४०० पेक्षा कमी मतदार मतदान करू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी २४,७२३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्ह्यातील मतदान केंद्रासाठी ५५१३ बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट तसेच ५९६९ व्हीव्हीपॅट यंत्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिकdindori-pcदिंडोरी