ओझर टाउनशिप : राजकारणाचे शुद्धीकरण आजच्या काळाची गरज असून, राजकारणातला सेवाभाव लुप्त पावला आहे. जनतेचा सेवक स्वत:ला मालक समजू लागला आहे. मालकी दृष्टिकोन आला की तेथे भ्रष्टाचार सुरू होतो. आपल्या देशाला सर्वाधिक शक्तिशाली बनवायचे असेल तर खऱ्या लोकशाहीचे दर्शन घडवावे लागेल त्यासाठी राजकारणाचे शुद्धीकरण गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.जनार्दनस्वामी मौनगिरी महाराज यांच्या मातोश्री म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथीनिमित्त ओझरच्या जनशांतिधाम येथे सुरू असलेल्या जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्याची रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. यावेळी उपस्थित भाविकांना धर्म उपदेश करताना स्वामी शांतिगिरी महाराज बोलत होते. यावेळी त्यांनी बाबाजींच्या अनेक आठवणी सांगीतल्या. जगद्गुरू बाबाजींच्या दिव्य परंपरा समाजासाठी वरदानकारी ठरत असून जपानुष्ठानाच्या माध्यमातून भाविकांच्या जीवनाला योग्य दिशा मिळत आहे. प्रत्येकाने आपापला धर्म पाळावा. पती आणि पत्नी संसररूपी रथाची दोन चाके असून यापैकी एकानेही असहकार दाखवला तर काय होईल ? म्हणून एकविचाराने संसार करा, अध्यात्माची , संत- संगतीची जोड असल्यास संसार आनंदी होऊ शकतो. असेही ते म्हणाले. राहुल शिंदे यांनी सदगुरु भक्तीपर गीते सादर करूण भाविकांना मंत्रमुग्ध केले. गायक रोशन बागल यांनीही सलग आठवडाभर भक्तीगीतांची सेवा केली. लक्षवेधी पालखी मिरवणूक आकर्षणाचे केंद्र ठरले. स्वामी शांतिगिरीजी महाराज मिरवणुकीत सहभागी झाल्याने भाविकांचा उत्साह वाढला. यावेळी हजारो महिलांच्या जपानुष्ठानाची सांगता जय बाबाजींच्या प्रचंड जयघोषात झाली. यावेळी जनशांती धामातील देवीदेवतांच्या आणि बाबाजींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
राजकारणाचे शुद्धीकरण आजची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 01:11 IST
ओझर टाउनशिप : राजकारणाचे शुद्धीकरण आजच्या काळाची गरज असून, राजकारणातला सेवाभाव लुप्त पावला आहे. जनतेचा सेवक स्वत:ला मालक समजू लागला आहे. मालकी दृष्टिकोन आला की तेथे भ्रष्टाचार सुरू होतो. आपल्या देशाला सर्वाधिक शक्तिशाली बनवायचे असेल तर खऱ्या लोकशाहीचे दर्शन घडवावे लागेल त्यासाठी राजकारणाचे शुद्धीकरण गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वामी शांतिगिरी महाराज यांनी केले.
राजकारणाचे शुद्धीकरण आजची गरज
ठळक मुद्देशांतीगिरीजी महाराज : म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्याची सांगता