मालेगाव महापौर, उपमहापौरांची आज निवड

By Admin | Updated: June 13, 2017 23:52 IST2017-06-13T23:52:18+5:302017-06-13T23:52:41+5:30

मालेगाव महापौर, उपमहापौरांची आज निवड

Today's election to Malegaon Mayor, Deputy Mayor | मालेगाव महापौर, उपमहापौरांची आज निवड

मालेगाव महापौर, उपमहापौरांची आज निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
ंमालेगाव : महापालिकेची महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक बुधवारी (दि. १४) होत आहे. सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत महापौर, उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे महापौर, उपमहापौर निवडणूक चुरशीची होऊन चमत्कार घडण्याची शक्यता आहे.
सत्तास्थापनेसाठी सभागृहात ऐनवेळी नवीन युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौरपदासाठी काँग्रेस व सेना एकत्रित आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, भाजपानेही सत्ता खेचून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. या निवडणुकीत एमआयएमची भूमिका निर्णायक ठरणार आहे. महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.
सभागृहात बहुमतासाठी ४३ सदस्यांची आवश्यकता आहे. निवडणुकीत अशा स्थितीत महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादी-जनता दल आघाडीमध्ये चढाओढ लागली होती. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दलासोबत जाईल, असे प्रारंभी दिसत होते; मात्र ऐनवेळी शिवसेनेने काँग्रेसशी बोलणी करून काँग्रेसला महापौर पदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादी व जनता दलाचे पदाधिकारी व नगरसेवक सत्ता स्थापनेसाठी ईर्षेला पेटले आहेत. भाजपानेही यंदा जोरदार मुसंडी मारली आहे. ९ नगरसेवक निवडून आल्यानंतर सत्तेत वाटा मिळविण्यासाठी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी व जनता दलासोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा भाजपा नगरसेवकांचा मनोदय आहे.

कॉँग्रेसला २८,

राष्ट्रवादी कॉँग्रेस - जनता दल आघाडीला २७,

शिवसेना १३,

भाजपा ९

व एमआयएमला ७ जागा मिळाल्या.

Web Title: Today's election to Malegaon Mayor, Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.