छटपूजा महोत्सवाचे आजपासून आयोजन
By Admin | Updated: October 29, 2014 00:35 IST2014-10-29T00:29:49+5:302014-10-29T00:35:03+5:30
छटपूजा महोत्सवाचे आजपासून आयोजन

छटपूजा महोत्सवाचे आजपासून आयोजन
नाशिक : कार्तिक शुक्ल षष्ठीला प्रारंभ होणाऱ्या छटपूजा महोत्सवाचे बुधवारपासून (दि. २९) शहरात हिंदी भाषिक राज कला सांस्कृतिक मंचच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. गोदातीरी यशवंतराव महाराज पटांगणावर ही पूजा होणार आहे. सूर्याला अर्घ्य देऊन नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अशोक मुर्तडक, आमदार देवयानी फरांदे उपस्थित राहणार आहेत.
प्रदूषणमुक्तीसाठी महोत्सवा-दरम्यान फटाके न उडविण्याचा निर्णय हिंदी भाषिक मंचने घेतला आहे. गुरुवारी (दि. ३०) छटपूजेची सांगता झाल्यावर परिसर स्वच्छ करण्यात येणार असून, शहरातील हिंदी भाषिक या उपक्रमात सहभागी होणार आहेत.