आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार

By Admin | Updated: June 3, 2014 23:33 IST2014-06-03T01:57:09+5:302014-06-03T23:33:17+5:30

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ आणि ६१ या दोन प्रभागांतील रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

From today's application for filing nominations | आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार

आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ आणि ६१ या दोन प्रभागांतील रिक्त जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेच्या वतीने अधिसूचना जारी करण्यात आली असून, सातपूर आणि नाशिकरोड प्रभागात ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक १७ मधील कॉँग्रेस नगरसेवक दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीत, तर प्रभाग ६१ चे मनसे नगरसेवक हेमंत गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविली. त्यामुळे दोघांनीही नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. येत्या २९ जून रोजी होणार्‍या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने अधिसूचना जारी केली असून, मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. ३ ते ९ जूनपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि १० जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २ यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. (प्रतिनिधी)

Web Title: From today's application for filing nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.