आज विजयादशमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:32 IST2017-09-29T23:32:51+5:302017-09-29T23:32:57+5:30
नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा सण अर्थात विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ३०) शहरात अनेक ठिकाणी सोने व नवीन वस्तू खरेदीबरोबरच व्यापारी प्रतिष्ठान, नवीन व्यवसाय आदींचा शुभारंभ होणार आहे.

आज विजयादशमी
नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा सण अर्थात विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. ३०) शहरात अनेक ठिकाणी सोने व नवीन वस्तू खरेदीबरोबरच व्यापारी प्रतिष्ठान, नवीन व्यवसाय आदींचा शुभारंभ होणार आहे. पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन, तसेच सायंकाळी गोदाघाटावर रावणदहन होणार आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या समारोपाला कालिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत आपट्याची पाने (सोने) फुले, हार आणि पूजेचे साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. शनिवारी अनेक ठिकाणी नवीन दुकाने, व्यापारी प्रतिष्ठानचा शुभारंभ होणार आहे