आज गजानन महाराज प्रगट दिन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 01:31 IST2018-02-07T01:31:44+5:302018-02-07T01:31:56+5:30

नाशिक : गंगापूररोड भागातील रामबाग सोसायटी परिसरात बुधवारी (दि.७) श्री गजानन महाराज प्रगट दिन सोहळा होणार आहे.

Today, Gajanan Maharaj revealed the day's celebrations | आज गजानन महाराज प्रगट दिन सोहळा

आज गजानन महाराज प्रगट दिन सोहळा

नाशिक : गंगापूररोड भागातील रामबाग सोसायटी परिसरात बुधवारी (दि.७) श्री गजानन महाराज प्रगट दिन सोहळा होणार आहे. या सोहळ्यास सकाळी ७.३० वाजता पादुकांना अभिषेक करून सुरुवात होणार असून, दुपारी १२ वाजता ग्रंथपारायण, दुपारी १२.३० महाआरती व महाप्रसादास सुरु वात, दुपारी ४ वाजता स्मिता तळवलकर यांचा भजनाचा कार्यक्र म होणार आहे. सायंकाळी महाआरती व प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तर गुरुवारी (दि. ८) सकाळी ९ वाजता श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण होणार आहे.
दरम्यान, उद्या पंचवटी येथे पार पडणाºया गजानन महाराज प्रगट दिन कार्यक्रमाची जय्यत तयारी यशवंतराव चव्हाण पटांगणावर सुरू असून, बुधवारी (दि.७) सकाळी आठ वाजता लोणार गल्ली येथून मिरवणुकीस सुरुवात होणार आहे.

Web Title: Today, Gajanan Maharaj revealed the day's celebrations

टॅग्स :Nashikनाशिक