आज शहरातील वीजपुरवठा बंद
By Admin | Updated: January 16, 2015 23:47 IST2015-01-16T23:47:04+5:302015-01-16T23:47:14+5:30
काही वाहिन्यांवरील तांत्रिक कामासाठी केलेला बदल

आज शहरातील वीजपुरवठा बंद
नाशिक : नाशिक शहर व ग्रामीण भागात तांत्रिक कामे तसेच देखभालीचे कामे प्रस्तावित असल्याने काही वीज वाहिन्यांवरील वीजपुरवठा तांत्रिक कामासाठी काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे.
भोसला मीलिटरी स्कूल, राणे नगर, कमोदनगर व नजीकचा परिसरात सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत वीजपुरवठा राहणार नाही. वासननगर या भागात सकाळी १० ते दुपारी २, तर औरंगाबादरोड, पंचवटी कारंजा, गंगाघाट, पंचवटी,
टेलीफोन एक्सचेंज, नागचौक, निमाणी बस स्टॅण्ड, रामालय हॉस्पिटल, रामकुंड, आयुर्वेदिक हॉस्पिटला या परिसरात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा राहणार नाही.
शिंदे, चिंचोळी, पळसे, पांढुर्ली या भागात सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत तसेच टाकळीरोड व नजिकच्या परिसरात सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत वीजपुरवठा बंद राहील.
सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेडे, एकलहरे व इतर परिसर याभागात दुपारी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा होणार नाही. तसेच नाशिक ग्रामीण ११ केव्ही मुकणे व शालिमार वाहिन्यांवरील सर्व ग्राहकांना सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत वीजपुरवठा उपलब्ध राहणार नाही तसेच इगतपुरी शहर भागातील ग्राहकांना सकाळी ११ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत वीजपुरवठा राहणार नाही तसेच घोटी, वैतरणा काळुस्ते, कांचनगाव, देवळा, परदेशवाडी आदि भागात सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहील.
महावितरण ग्राहकांना होणाऱ्या गैरसोईबद्दल दिलगीर असून, ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)