शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे आज वाहतूक मार्गात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 01:08 IST

श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (दि.२३) काढण्यात येणार असून, या दिवशी मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी काही ठिकाणावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत़

नाशिक : श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (दि.२३) काढण्यात येणार असून, या दिवशी मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी काही ठिकाणावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत़ सकाळी १० वाजेपासून ते मिरवणूक संपेपर्यंत वाहतूक मार्गातील बदल लागू असल्याची अधिसूचना पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी काढली आहे़  शहरातील मुख्य मिरवणुकीसह इतर लहान-मोठ्या मंडळांच्या मिरवणुका, घरोघरच्या गणेशमूर्तींचे विसर्जन यासाठी गंगा घाटावर तसेच इतर विविध ठिकाणी मूर्ती संकलन तसेच विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी अपघात अगर काही गोंधळ होऊ नये यासाठी प्रत्येक विसर्जन ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  श्रीगणेश विसर्जन निमित्त होणाऱ्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरात कडक पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. शहरातील पोलीस अधिकाºयांसह सुमारे सव्वादोन हजार पोलीस कर्मचारी कार्यरत असणार आहेत.वाहतुकीतील बदलपंचवटी डेपो, निमाणी बस स्टॅण्ड, महामार्ग, सिडको इत्यादी विभागांतून नाशिकरोड रेल्वेस्टेशन येथे जाणाºया राज्य परिवहन विभागाच्या बसेस दत्तमंदिर सिग्नलपर्यंत जातील व तेथूनच परत येतील. सिन्नरकडे जाणाºया राज्य परिवहन मंडळाच्या बसेस व इतर वाहने उड्डाणपुलावरून ये-जा करतील.गंगापूर पोलीस ठाणे (आनंदवली नदीपात्र)आनंदवली नदीपात्रात विसर्जनासाठी गर्दी होते. यासाठी चांदशीगाव ते आनंदवली नदीपात्र आणि आनंदवली नदीपात्र ते चांदशी गावापर्यंतचा मार्ग दोन्ही बाजूने (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी ४ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिककडे येणाºया व नाशिकहून चांदशीकडे जाणाºया वाहनधारकांनी आनंदवली पुलाकडे न जाता चांदशीगावरोडने नाशिक तट कालवा येथून उजव्या बाजूने वळून कालव्यामार्गे मखमलाबाद रोडने लागून रामवाडीमार्गे अशोकस्तंभ ते गंगापूररोड अशी ये-जा करावी.जेलरोड विभागनांदूर नाका ते सैलानीबाबा चौक हा मार्ग दोन्ही बाजूने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी (मिरवणुकीतील वाहने वगळून) दुपारी १२ वाजेपासून ते मिरवणूक संपेपयत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात नाशिकरोड विभागातील नांदूर नाका ते सैलानीबाबा चौक या मार्गाने जाणारी वाहने ही नांदूर नाका औरंगाबाद रोडने तपोवनातील स्वामी जनार्दन पूलमार्गे जातील व त्याच मार्गाने येतील.देवळाली कॅम्प पोलीस ठाणेश्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्य दिवशी दुपारी १२ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत नाशिकरोड - देवळाली कॅम्प या मार्गावरील सिलेक्शन कॉर्नर-झेंडा चौक - शारदा हॉटेल - जमा मशिद रोड- जुने बसस्टॅण्ड- सिलेक्शन कॉर्नर- संसरीनाका - संसरीगाव दारणानदीपर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी (मिरवणूकीतील वाहने सोडून) बंद करण्यात येणार आहे़शहरातील मुख्य विसर्जन मिरवणूक मार्गवाकडी बारव (चौक मंडई) येथून जहांगिर मशिद - दादासाहेब फाळके रोड - फुले मार्केट - बादशाही लॉज कॉर्नर - विजयानंद थिएटर - गाडगेमहाराज पुतळा - गो. ह. देशपांडे पथ - धुमाळ पॉइंट - सांगली बँक सिग्नल - महात्मा गांधी रोड - मेहेर सिग्नल - स्वामी विवेकानंद रोड - अशोकस्तंभ - नवीन तांबट आळी - रविवार कारंजा - होळकर पूल - मालेगाव स्टॅण्ड - पंचवटी कारंजा - मालवीय चौक - परशुराम पुरिया रोड - कपालेश्वर मंदिर - भाजीबाजार - म्हसोबा पटांगणावरून विसर्जन ठिकाण.शहरातील पर्यायी वाहतूक व्यवस्थाया कालावधीत निमाणी बसस्थानकातून पंचवटी कारंजा येथून सुटणाºया शहर वाहतुकीच्या सर्व बसेस पंचवटी डेपोतून सुटतील. ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाºया बसेस व इतर सर्व प्रकारची वाहने ही आडगाव नाका, कन्नमवार पूल व पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहर व इतर ठिकाणी जातील. दरम्यान, पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल कन्नमवार पुलावरून जातील. रविवार कारंजा व अशोकस्तंभ येथून सुटणाºया बसेस शालिमार येथून सुटतील व त्याच मार्गाने ये-जा करतील.नाशिकरोड गणेश विसर्जनमिरवणूक मार्गनाशिकरोडला बिटको चौकातून मिरवणुकीस सुरुवात होईल. बिटको चौकातून सुरू झालेली मिरवणूक शिवाजी महाराज पुतळा - देवी चौक - रेल्वेस्टेशन पोलीस चौकी - सुभाषरोड - सत्कार पॉइंट - देवळालीगाव गांधी पुतळा - खोडदे किराणा दुकान ते वालदेवी नदी देवळालीगावपर्यंत जाणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस